आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण उपकेंद्रात भरदुपारी अग्नितांडव, लाखो रुपयांचे साहित्य खाक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमअायडीसी परिसरातील वीज वितरण कंपनीचे ३३-११ केव्हीचे उपकेंद्र गाेडाऊनला शनिवारी दुपारी १२.१५ वाजेच्या सुमारास अाग लागली. यात लाखाे रुपयांचे साहित्य खाक झाले. मात्र, प्राणहानी टळली. महापालिका खासगी असे २० अग्निशमन बंब १०० फायर एक्स्टिंग्यूशरच्या मदतीने अाग अाटाेक्यात अाणली. परंतु, अागीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
एमअायडीससी परिसरात वीज वितरण कंपनी क्राॅम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे गाेडाऊन उपकेंद्र अाहे. तेथील सुरक्षारक्षक कैलास जाधव प्रशांत पवार हे जेवण करीत असताना स्फाेट झाल्याचा अावाज अाला. दाेघांनी प्रत्यक्ष जाऊन बघितले असता गाेडाऊनला अाग लागल्याचे लक्षात अाले. त्याचवेळी उपकेंद्राकडेही अाग लागली हाेती.एकाच वेळी दाेन्ही ठिकाणी अाग लागली हाेती. या अागीत ट्रान्सफाॅर्मर, प्लास्टिकचे मीटर, वायर बंडल, ऑइलचे बॅरल, मीटर बंच कंडक्टर, मीटर केबल, लाकडी कपाट, फळ्या तसेच जुनी वाहने असे साहित्य खाक झाले. दरम्यान, वीज वितरण कंपनी क्राॅम्प्टन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
आगीत क्रॉम्प्टन वीज कंपनी वीज वितरण कंपनी यांचे मिळून ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शनिवारी विद्युतपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रविवारी तो सुरळीत सुरू राहणार आहे. - मुकेशचौधरी, शहर अभियंता, क्रॉम्प्टन

तप्त ऊन अन् अागीचे चटके

अागीतप्लास्टिक रबराचे साहित्य माेठ्याप्रमाणात जळाल्याने दुर्गंधीयुक्त धुराचे प्रचंड लाेट अाकाशाकडे झेपावत हाेते. यामुळे परिसरातील वाहतूकही थांबवली हाेती. त्यात भर दुपारी तापलेले ऊन अाणि अागीची चटके मदत कार्य करणाऱ्यांना अंगावर घ्यावे लागले. कर्मचारी अक्षरश हातात पाण्याचे कॅन घेऊन अाग पसरत असलेल्या गवतावर पाणी टाकत हाेते. अाग विझवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी माेठे धैर्य दाखवून अाग विझवण्यात यश मिळवले.

गवतामुळे अागीचे राैद्ररूप धारण

या उपकेंद्राच्या परिसरात काही साहित्य अनेक दिवसांपासून एकाच ठिकाणी पडलेले अाहे. आजूबाजूला मोठ-मोठे गवत वाढले अाहे. ते वाळलेले असल्यामुळे ही आग पसरली.
कोट्यवधी रुपयांचे सामान ठेवलेल्या ठिकाणी केवळ दोनच सुरक्षारक्षक आहेत. अशा ठिकाणची सुरक्षा व्यवस्था चोख असणे गरजेचे आहे. निकामी झालेले साहित्य बाहेर काढले पाहिजे. जे साहित्य वापरात आणायचे आहे, त्यांच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवली गेली पाहिजे होती.
एमअायडीसी परिसरातील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राला लागलेल्या अागीने धुराचे लाेट पसरल्याने रस्ता अाणि पलिकडचा भाग पूर्णपणे झाकाेळला गेला.