आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेस्थानकावरील आवाज गोळीबाराचा नाहीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन दिवसांपूर्वी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वरील आरपीएफ कार्यालयातील एका खोलीत गोळीबाराचा आवाज झाल्याची घटना घडली होती. आरपीएफच्या अधिका-यांनी हा आवाज गोळीबाराचा नसून फुगा फुटल्याचा असल्याचे सांगितले होते. मात्र, अनेकांच्या मते हा आवाज गोळीबाराचाच असल्याचे म्हणणे होते. या प्रकरणात आरपीएफच्या अधिका-यांनी चौकशी केली असून हा आवाज गोळीबाराचा नसल्याचा दावा आरपीएफचे निरीक्षक करीत आहेत.
रेल्वे स्थानकावरील आरपीएफ कार्यालयात गोळीबाराचा आवाज आला होता. त्यामुळे काही वेळ खळबळ उडाली होती. त्या वेळी हा अवाज गोळीबाराचा नसून एका कर्मचा-याच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आणलेला फुगा फुटल्याचा असल्याचा दावा आरपीएफच्या अधिका-यांनी केला होता. तर आपीएफचे निरीक्षक अतुल टोके यांनी मात्र चौकशी करतो असे सांगितले होते.
निरीक्षक टोके यांच्या म्हणण्याप्रमाणे हा आवाज गोळीबाराचा नाही. तसेच फायर झालेल्या गोळीचे कुठलेही निशाण या खोलीत नाहीत. त्याचप्रमाणे आरपीएफकडे असलेल्या गोळ्यांचा साठा देखील व्यवस्थित आहे. त्यामुळे आमच्या कोणत्याही कर्मचा-याच्या हातून चुकीच्या पद्धतीने फायर झाले नसल्याचे त्यांचे म्हणणे असून तो आवाज फुगा फुटल्याचाच होता. या मतावर निरीक्षक टोके हे ठाम आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोळीबारासारखा झालेल्या आवाजाची संभ्रमावस्था अजून कायम आहे. पण ज्यावेळी रात्री पुणे-भुसावळ एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर आली.
त्याचवेळी हा आवाज झाल्याने प्रवाशांची आरपीएफ कार्यालयाभोवती मोठी गर्दी झाली होती. आरपीएफ कार्यालयातील काही कर्मचा-यांनी तत्काळ कार्यालयाचे दरवाजे बंद केले होते. जर गोळीबार झाला नाही तर मग कर्मचा-यांनी दरवाजा का बंद केला? या प्रश्नाचे उत्तर मात्र निरीक्षक टोके देऊ शकले नाहीत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. आवाजाने सगळेजण आश्चर्यचकित झाले होते. अखेर याबाबतीत रेल्वे सुरक्षा अधिका-यांनी चौकशी करून त्यात तथ्य नसल्याचा दावा केला आहे.