आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने लुबाडणार्‍या बनावट दिग्दर्शकाला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने ऑडिशनसाठी प्रत्येकी 300 रुपये लुबाडणार्‍या एका बनावट दिग्दर्शकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्याने लुबाडणूक करून घेतलेले पैसे परत करण्यास लावण्यात आले.

काही वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन नवीन चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचा बहाणा करून एका ठगाने गांधी उद्यानात ऑडिशन ठेवत तरुणांची फसवणूक करण्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. ऑडिशनला आलेल्या प्रत्येकाला 300 रुपये फी ठेवण्यात आली होती. मात्र, तेथे ऑडिशनचे कोणतेही साहित्य ठेवण्यात आलेले नव्हते. डांभुर्णी येथील कमलाकर भागवत कोळी हा ठग एका हातात कागद घेऊन काही संवाद वाचून दाखवत होता. त्यातील एका मुलाला आपली फसवणूक होत असल्याचा संशय आल्याने त्या तरुणाने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या बाबत माहिती दिली. काही मिनिटातच जिल्हापेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी त्या बनावट दिग्र्दशकची विचारपूस केल्यावर तो उलटसुलट उत्तरे देऊ लागला. पोलिस निरीक्षक वाय.डी.पाटील यांचे समोर त्याची विचारपूस केली असता त्याने सर्व माहिती देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला पोलिसी हिसका दाखवताच 50 ते 60 जणांचे पैसे त्याने परत केले. या बाबत रात्री उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.