आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस पाटीलाने चोरीच्या चारचाकींची संख्या 22 वर; म्होरक्याच्या शोधार्थ पथक मुंबईला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- चोरीच्या चारचाकी बनावट कागदपत्रे तयार करून विकणार्‍या मेहरगावचा (ता.अमळनेर) पोलिस पाटील किशोर पिरन पाटील आणि त्याचा चुलत भाऊ भूषण भीमराव पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले होते. सोमवारी त्यांनी 15 चारचाकीची तर मंगळवारी आणखी सात चारचाकी विक्रीची कबुली दिली. या सात चारचाकी मंगळवारी पोलिसांनी ताब्यात घेतल्या. दरम्यान, या रॅकेटचा म्होरक्या मुंबईत असल्याची माहिती मिळाल्याने पथक मुंबईला रवाना झाले आहे. राज्यातील अनेक शहरात या टोळीची पाळेमुळे रोवली असल्याची माहिती हळूहळू समोर येत आहे. पोलिसांनी किशोर याच्या मोबाइलहून काही जणांना संपर्क करून त्यांचे पत्ते मिळवले आहेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यभरात शेकडो वाहने चोरला गेली आहेत; पण अद्याप वाहने चोरणार्‍या टोळीतील कोणताही सदस्य जेरबंद झालेला नव्हता. किशोरच्या रुपात आता पोलिसांना धागा गवसला आहे. त्यामुळे भविष्यात मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.
गाडी मालकांची पोलिसांकडे धाव
किशोर पाटील याने चोरी केले 13 वाहने जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विकली होती. पोलिसांनी मंगळवारी चोरीची वाहने खरेदी करणार्‍या 13 जणांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले. या सर्व वाहनांचे ओरिजनल चेचीस नंबर पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत. आता या वाहनांच्या खर्‍या मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
‘त्या’ पोलिस पाटीलला सहा दिवस कोठडी
मंगळवारी किशोर आणि भूषण यांना न्यायाधीश आर.बी.ठाकूर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोघांनाही सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे एम.एस.फुलपगारे यांनी काम पाहिले.