आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापा-यांना 25 लाखांत गंडवणा-या ठकास अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- बनावटदस्ताऐवज तयार करून राज्यभरातील 15 व्यापाऱ्यांची 25 लाख रुपयांत लुबाडणूक करणा-या गणेश कांतराव पिगाळकर (रा. हिंगोली, बदललेले नाव गणेश लक्ष्मीकांत कौलवार) याला चार दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. जळगावच्या साईनाथ टायर्सचे संचालक सोमनाथ गुरव यांची दोन लाखात फसवणूक केल्याप्रकरणी त्याला अटक केली होती.
चार दिवसांच्या तपासातून या ठगाने राज्यभरातील 14 व्यापाऱ्यांना ठगल्याची माहिती उघड झाली आहे. अत्यंत सराईतपणे बनावट कागदपत्रे तयार करणे, इंटरनेटचा वापर करून लोकांना प्रलोभने देणे, विमानाने प्रवास करणे, अशी कार्पोरेट पद्धत अवलंबून त्याने अनेक व्यापाऱ्यांना सहज फसवले होते. पुण्यात आपली गणेश ट्रेडर्स नावाची कंपनी असून आपण टायर विक्री करतो, असा बनाव त्याने निर्माण केला होता. इंटरनेटवरील जस्ट डायल साइटवरून राज्यातील टायर्स विक्रेत्यांचे नाव, पत्ते, फोन नंबर, मेल आयडी मिळवून, त्यांना स्वस्तात टायर देतो, असे सांगून बँकेचा अकाउंट नंबर देऊन लाखो रुपये त्याने मागवून घेतले. पुण्यातील हॉटेल राधिका या ठिकाणी राहून तेथील वेटरच्या नावावरही पैसे मागवले. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
..असासापडला कचाट्यात
एलसीबीच्यापथकाला मिळालेल्या माहितीनुसार पथकाने पुण्यात सापळा रचला. तेथे पोहोचल्यानंतर ठगाने ते हॉटेल सोडल्याची माहिती मिळाली. मात्र, तो भुसावळ येथील एका व्यापाऱ्याच्या संपर्कात होता. त्या व्यापाऱ्याकडून पैसे मागवण्यासाठी ठगाने पुण्यातील रोहन होंडा येथील अकाउंट नंबर दिला होता. भुसावळच्या व्यापाऱ्याला एलसीबीच्या पथकाने अकाउंटमध्ये पैसे टाकण्यास सांगितले. पैसे टाकताच व्यापाऱ्याने ठगाला फोन केला. फोन करताच ठग हिंगोली येथून स्विफ्ट कारने 10 तासांत पुण्याला आला. शोरूममध्ये पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ठग या शोरूममध्ये दुचाकी बुक करून ठेवत होता. फसवलेल्या व्यापाऱ्याने शोरूमच्या अकाउंटवर पैसे टाकताच ठग तेथे जाऊन बहाणे करून दुचाकी खरेदी करण्याऐवजी पैसे काढून घेत होता. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उप निरीक्षक अजय खर्डे, दिलीप येवले, मुरलीधर आमोदकर, मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, सुरेश महाजन, महेश पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने आणि रवींद्र चौधरी यांचा पथकात समावेश होता.