आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोतया पोलिसांनी पासष्ट हजारांचे दागिने लांबवले, भरदिवसा रस्त्यावर घडलेली घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - ‘आम्ही पोलिस आहोत. एका महिलेचा चाकूने खून करण्यात आला आहे. त्यामुळे आम्ही खुन्याचा शोध घेत आहोत. तुमचे दागिने जपून ठेवा’ असा सल्ला देत व मदतीचा बहाणा करत दोन तोतया पोलिसांनी वृद्ध महिलेचे 65 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील वाडीभोकर रोड परिसरात घडली. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

वाडीभोकर रोडलगत सुयोगनगर वसाहत आहे. या वसाहतीतील प्लॉट क्रमांक 61मध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ.मुरलीधर शहा राहतात. त्यांच्या पत्नी रार्जशी शहा (70) या सोमवारी दुपारी साडेबारा वाजता रुग्णालयात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या. वाडीभोकर रस्त्याने जात असताना मोटारसायकलवर आलेले दोन जण त्यांच्याजवळ येऊन थांबले. दोघांनी त्यांना पोलिस असल्याची बतावणी केली. त्याचबरोबर श्रीमती शहा यांना दागिने जपून रुमालात ठेवा, असे सांगितले. तसेच मदतीचा आव आणून हातचलाखी करून रार्जशी शहा यांचे सुमारे 65 हजारांचे दागिने लंपास केले. त्यात 25 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 10 ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या आदी दागिन्यांचा समावेश आहे. त्यानंतर दोघे भामटे पसार झाले. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यावर र्शीमती शहा यांनी पश्चिम देवपूर पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. दोघे तोतया पोलिस 25 ते 30 वयोगटातील आहेत. शहा यांच्या तक्रारीवरून तोतया पोलिसांविरुद्ध भादंवि कलम 170, 420, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक पी.एस.जगताप व महेंद्र जाधव तपास करत आहेत.