आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटई कंपनीच्या शोषखड्ड्यात दोघा भावंडांचा बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एमअायडीसीतील साेना इंडस्ट्रीज या चटई कंपनीने सांडपाण्यासाठी जगवाणीनगरात शाेषखड्डा तयार केला अाहे. या खड्ड्यात खेळताना पडल्याने वाॅचमनच्या दोघा मुलांचा करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरी वस्तीलगत सांडपाणी सोडणाऱ्या कंपनी मालकांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.
एमअायडीसीत प्लॉट क्रमांक सी-७ मध्ये दिलीप चाैधरी यांची सोना इंडस्ट्रीज ही चटईचा दाणा तयार करण्याची कंपनी अाहे. ती सध्या अनिल बाफना यांनी चालवायला घेतली अाहे. कंपनीतील सांडपाण्याच्या (केमिकलचे नव्हे) विल्हेवाट लावण्यासाठी कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या जगवाणीनगरातील दिलीप चोपडा यांच्या शेतात शाेषखड्डा तयार केला अाहे. या शेताला कुंपण असले तरी त्यातून आतमध्ये कुणालाही सहज प्रवेश करता येतो. शेताला लागूनच धीरज महाजन यांच्या अंजनी क्लासिक कन्स्ट्रक्शन अंतर्गत सदनिकेचे {चटई कंपनीच्या...
बांधकामसुरू आहे. तेथे मांगिलाल वराला बारेला(वय २८) हे वॉचमनचे काम करतात. कॉन्ट्रॅक्टरने त्यांना बांधकामाच्या ठिकाणी रहाण्यासाठी पत्र्याची खोली तयार करून दिली आहे. तेथे वाॅचमन पत्नी मनीषा चार मुलांसह राहत अाहे. शुक्रवारी दुपारी १.३० वाजता मांगिलाल जेवणासाठी घरी अाला. त्या वेळी खुशाल (वय वर्ष) विशाल(वय वर्ष) हे दाेघी वाॅचमनची मुले बांधकाम सुरू असलेल्या रस्त्याच्या बाजूला खेळत हाेती. थाेड्या वेळाने मांगिलाल मुलांना जेवणासाठी बोलावण्यास अाला. पण त्याला मुले दिसली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. ताे चटई कंपनीच्या सांडपाण्याच्या खड्ड्याजवळ अाला. तेथे त्याला मुलाची चप्पल दिसल्याने त्याला शंका अाली. म्हणून त्याने काठीच्या साहाय्याने खड्ड्यामध्ये मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळेस बुडालेल्या विशालचा मृतदेह पाण्यावर तरंगला. पोटच्या गोळ्याचा मृतदेह बघून मांगिलालचे सर्व अवसान गळाले. ताे जाेरात अाक्राेश करू लागला हे पाहून पत्नी मनीषा या घटनास्थळाकडे धावत आली. हे पाहून जगवाणीनगरातील नागरिकही घटनास्थळाकडे धावत अाले. या वेळी मांगिलालने कुठलाही विचार करता थेट खड्ड्यात उडी मारली. त्या वेळी त्याला खुशालचाही मृतदेह अाढळून अाला. त्यानंतर दाेघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात अाणण्यात अाले. दोन्ही मुलांवर मेहंदळे (ता. सेंधवा) या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अामदारांकडून सांत्वन : घटनेचीमाहिती कळाल्यानंतर आमदार सुरेश भोळे हे सिव्हिलमध्ये दाखल झाले. त्यांनी बारेला दांपत्याला धीर देऊन त्यांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी कंपनीच्या सांडपाण्याची विल्हेवाट कंपनीतच केली पाहिजे. ते नागरी वस्तीत जाता कामा नये, यासाठी कंपनी मालक एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खड्ड्याला आडोसा नसल्याने घडली घटना
कंपनीचे सांडपाणी रस्त्यालगत असलेल्या शेतातील खड्ड्यात सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. त्या खड्ड्याला कंपनीमालकाने अाडाेसा केल्यामुळे ही घटना घडली. इतरही लहान मुले या परिसरात खेळत असतात. त्यामुळे या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरी वस्तीलगत पाणी सोडणाऱ्या सोना इंडस्ट्रिजच्या मालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ललित शर्मा, मनोज गायकवाड यांच्यासह स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

...तर कंपनी बंद करण्याची होऊ शकते कारवाई
^प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार कंपन्यांमधील केमिकलयुक्त किंवा सांडपाण्याची (डोमेस्टिक) विल्हेवाट कंपनीच्या आवारातच लावणे बंधनकारक आहे. कंपनीचे सांडपाणी बाहेर चारी खोदून शोषखड्ड्यात विल्हेवाट लावता येत नाही. असे केले तर ते प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करणारे आहे. साेना इंडस्ट्रीजने सांडपाण्याची कंपनीच्या आवारात विल्हेवाट लावली नसल्यास कंपनी मालकाला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येईल. या प्रकरणात कंपनी बंद करण्याचीही कारवाई पडताळणी केल्यानंतर होऊ शकते. अशोक करे, उपप्रादेशिकअधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

दोघा मुलांचे मृतदेह पाहून माता नि:शब्द
दोन्ही मुलांचे मृतदेह बघून मनीषा यांच्यावर आभाळच कोसळले होते. खुशाल विशालच्या मृतदेहाला कवटाळून त्या रडत होत्या. डोळ्यातून केवळ अश्रू अोघळत होते; परंतु ताेंडातून एक शब्दही येत नव्हता. त्या पटापट लेकरांचे मुके घेत होत्या. नि:शब्द झालेल्या त्या मातेची ममता बघून उपस्थितांचे डाेळे पाणावले हाेते.

खड्ड्यासाठी शेतमालकाची परवानगी
^सोनाइंडस्ट्रीजमध्ये चटईचा दाणा बनवण्यात येतो. हा दाणा धुण्यासाठी वापरलेले पाणी शाेष‌खड्ड्यात सोडण्यात येते. यासाठी शेतमालक चोपडा यांची परवानगी घेतली आहे. अधिक माहिती हवी असल्यास एमआयडीसी पोलिस ठाण्याशी संपर्क साधा. अनिल बाफना, कंपनी चालवणारे