आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूग, उडीदसह चणा डाळीच्या दरात घसरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - गेल्यामहिन्यात वाढलेले डाळींचे भाव सध्या काहीअंशी कमी झाले आहेत. तूर, उडीद, चणा आणि मूग या डाळींच्या दरात प्रतीकिलो तीन ते आठ रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना रमजानसह अधकि मासात दिलासा मिळाला आहे. रमजान अधकि मासामुळे सध्या बाजारपेठ फुलली आ. दरम्यान, आगामी आठवडाभरात बाजारात तेजी येण्याचे संकेत आहेत.

वर्षभरासाठी लागणाऱ्या डाळी आणि धान्याचा साठा उन्हाळ्यात अधकि प्रमाणात केला जाआ. मात्र, उन्हाळ्यातच डाळींचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले होते. चणा डाळ वगळता सर्वच डाळी १०० रुपये प्रतीकिलोपेक्षा अधकि महाग झाल्या होत्या. मात्र, या आठवड्यात डाळींचे दर काही प्रमाणात स्थिरावले आहेत. तूर डाळीच्या दरात चार ते सहा, उडीद डाळीत आठ, चणा डाळीत तीन मूग डाळीच्या दरात चार रुपये प्रतीकिलो घट झाली आहे. भाव कमी झाले असले तरी, वर्षभराची धान्याची खरेदी आटोपली असल्याने ग्राहकांना याचा लाभ मिळणार नाही. मात्र, दरमहा किराणा घेणाऱ्या ग्राहकांना याचा फायदा घेता येणार आहे. तथापि, खरीप हंगामाची पेरणी कशी होते यावरही बरेच काही अवलंबून आहे.
असे आहेत डाळींचे दर
प्रकारपूर्वीचे दर सध्याचे दर
तूरडाळ १०० ते ११० ९६ ते१०६
उडीद डाळ ११८ ११०
चना डाळ ६३ ६०
मूग डाळ ११२ १०८
खजूर, ड्रायफ्रूटचे भाव यंदा स्थिर
रमजानमध्येहीड्रायफ्रूटचे दर गतवर्षाप्रमाणेच आहेत. सध्या बाजारात सर्वसाधारण खजुराचे दर १०० ते २२५ रुपये किलोवर स्थिर आहेत. केवळ तुकडा काजू ५२० रुपये किलोवरून ६०० ते ६२०पर्यंत पोहोचला आहे.
आगामी काळात दर कमी होतील
तूरडाळीची शासनाकडून आयात होणार असल्याने दर कमी झाले. पंधरवड्यात दरात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. लवकरच बाजारपेठेत तेजी येऊन ग्राहकी वाढेल. निर्मलकोठारी, संचालक, साईजीवन सुपर शॉप, भुसावळ
बातम्या आणखी आहेत...