आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडती येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चोपडा - वडती येथील राजेंद्र पंडित निनायदे (वय ४६) या कर्जबाजारी शेतकऱ्याने ११ रोजी पहाटे वाजेपूर्वी चोपडा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. वडती येथील राजेंद्र निनायदे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. मागच्या वर्षी कापूस पिकला नाही. तसेच केळीला भाव मिळाल्याने ते कर्जबाजारी झाले. त्यांनी बँक ऑफ इंडिया शाखेतून लाख २५ हजाराचे कर्ज घेतले होते. यावर्षी शेतात कापूस लागवड केली. मात्र, अतिवृष्टीने उभे पीक वाहून गेले. चोपडा येथील संजीवनीनगरातील भाड्याच्या खोलीत गळफास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, वडील असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...