आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंटेनरची रिक्षाला धडक; पती-पत्नी, मुलगा ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर (जि.धुळे)- मध्य प्रदेशातील सेंधवा येथून खिडकिया येथे रिक्षाने अायुर्वेदिक उपचारासाठी जाणाऱ्या  नामपूर (ता. सटाणा ) येथील अहिरे परिवारावर काळाने घाला घातला. रिक्षाला कंटेनरने धडक दिल्याने पती-पत्नीसह मुलगा जागीच ठार झाले.  सटाणा तालुक्यातील नामपूर येथील साेमनाथ वेदुजी अहिरे हे पत्नी ताराबाई साेमनाथ अहिरे अाणि मुलगा नरेंद्र साेमनाथ अहिरेंसह अायुर्वेदिक उपचारासाठी सेंधवा येथे गेले हाेते. 


तेथून ते िरक्षाने  सेंधव्याकडून खिडकिया येथील अायुर्वेदिक दवाखान्यात जात हाेेते. रस्त्यात त्यांच्या रिक्षाला मुंबईकडून इंदूरकडे जाणाऱ्या कंटेनरने धडक दिली. कंटेनरची धडक इतकी जाेरदार हाेती की, रिक्षाचा चुराडा झाला. तसेच रिक्षातील साेमनाथ अहिरे हे बाहेर फेकले गेले तर त्यांची पत्नी ताराबाई अहिरे व मुलगा नरेंद्र अहिरे हे रिक्षामध्ये दाबले गेले. 

बातम्या आणखी आहेत...