आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मेळाव्यात अवतरले नरेंद्र मोदी; वल्लभभाईंनीच साकारला अखंड भारत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - देशातील 562 संस्थाने एकत्र करून अखंड भारताची कल्पना प्रत्यक्षात साकारणारे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्य महान आहे. त्यांची संपूर्ण जगाला माहिती व्हावी म्हणून गुजरातमध्ये 182 मीटर उंचीचा धातूचा पुतळा उभारला जात आहे. सरदार पटेल हे कोणत्या एका जाती, धर्माचे अथवा राजकीय पक्षाचे नसल्याने त्यांच्या पुतळ्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. देशातील प्रत्येकाने यासाठी हातभार लावावा व देश कसा एकसंघ आहे हे दाखवून द्यावे, असे प्रतिपादन गुजरातच्या महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांनी केले.
छायाचित्र : सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्र्स्टतर्फे शुक्रवारी सागर पार्कवर शेतकरी मेळावा झाला. सभामंडपात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हुबेहूब प्रतिकृती लावण्यात आली होती. दुरुन बघणार्‍यास जणू मोदीच आल्याचा भास होत होता.

पुढील स्लाइडमध्ये, वल्लभभाईंनीच साकारला अखंड भारत