आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांची कृषी कार्यालयावर धडक ; मार्गदर्शक सूचना बदलल्याने उद‌्भवला वाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - पाणलोट योजनेच्या मार्गदर्शक सूचना बदलल्यामुळे अनुदान मिळत नसल्याने तालुक्यातील काही संतप्त शेतकरी सोमवारी तालुका कृषी कार्यालयावर धडकले. आठ दिवसांत अनुदान मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन योजनेंतर्गत टक्के रक्कम अल्पभूधारक शेतकऱ्यास वैयक्तिक लाभासाठी मिळते. त्यातून शेतकऱ्याची गरज मागणीनुसार बैलजोडी पूरक म्हणून दुग्धव्यवसायासाठी गायी-म्हशी खरेदी करून लाभार्थी हिस्सा घेऊन वैयक्तिक लाभ मिळतो. या योजनेच्या प्रचार-प्रसाराप्रमाणे वाकडी, कासली, गोराडखेडा, ढालगाव राहेरा या गावांतील अल्पभूधारक शेतकऱ्यांची पाणलोट समितीमार्फत निवड केली. निवड केलेल्या लाभार्थ्यांनी समितीच्या सूचनेनुसार जानेवारी २०१३मध्ये १० टक्के लोकवाटा भरून कृषी विभाग समितीच्या मार्गदर्शनाखाली बैलजोड्या खरेदी केल्या. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून जामनेर तालुका कृषी कार्यालयात जून महिन्यात अनुदान मागणीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर कृषी कार्यालयाने जवळपास महिन्यांनंतर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे हे प्रस्ताव पाठवून अनुदानाच्या रकमेची मागणी केली.
दरम्यान, वसुंधरा पाणलोट योजनेच्या संचालकांनी नियमांत बदल करून यांत्रिकीकरण साहित्य खरेदीच्या सूचना केल्या. मात्र, नियम बदलल्याने बैलजोड्या खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना आता अनुदानाची रक्कम मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी साेमवारी तालुका कृषी कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

निधी संपला
^वरिष्ठांच्या सूचनेनुसार २०१३मध्ये गरजेवर आधारित उपजीविका आराखडा सादर केला. तसेच मार्गदर्शक सूचना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बैलजोड्या खरेदी केल्या. नंतर प्रस्ताव पाठवला होता. मात्र, निधी संपल्याने अनुदान मिळू शकले नाही. २०१४मध्ये यांत्रिकीकरण साहित्य खरेदीच्या मार्गदर्शक सूचना आल्याने शेतकऱ्यांचे अनुदान रखडले आहे. रमेशजाधव, तालुकाकृषी अधिकारी, जामनेर

लाभार्थ्यांना दिल्यात बैलजोड्या
^कृषी विभागाच्या सूचनांप्रमाणे पाणलोट समितीने लाभार्थी निवडले. समिती कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवडलेल्या लाभार्थ्यांना बैलजोड्या घेऊन दिल्या. मात्र, कागदपत्रांची पूर्तता करूनही प्रस्ताव दिले. त्यानंतर यांत्रिकीकरणाचा नियम आल्याने अनुदान मिळणे अवघड झाले आहे. रवींद्रपरदेशी, पाणलोटसमिती अध्यक्ष

^कागदपत्रांची पूर्तता करून लाभार्थी निवडण्यासाठी गावात दवंडी देण्यात आली होती. अल्पभूधारक असल्याने पाणलोट समितीकडे अर्ज केला. निवड झाल्याने समिती कृषी विभागाच्या सूचनांचे पालन करून व्याजाने पैसे काढून बैलजोडी खरेदी केली. मात्र, त्यानंतर अर्ज करून वर्ष उलटले तरीही अनुदान मिळालेले नाही. सुभाषपरदेशी, लाभार्थीशेतकरी, वाकडी