आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्यास भाव नसल्याने शेतकऱ्याची अात्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावल / धानोरा - भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असूनसुद्धा केंद्र राज्य सरकारने भाववाढीसाठी काहीही उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जात नाही. यामुळे अापण अात्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून किनगाव येथील मुबारक तडवी या तरुण शेतकऱ्याने बुधवारी अापली जीवनयात्रा संपवली. मुबारक यांनी ११ एकर जमिनीवर कांदा लावला हाेता; परंतु कांद्याला भाव मिळाला नाही.

किनगाव येथील रहिवासी दगडू दिलदार तडवी या शेतकऱ्याकडे १७ एकर शेती आहे. या शेतीची सर्व कामे मुलगा मुबारक तडवी (वय ४५) हा पहायचा. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या मुबारकने यंदा सहा एकरात केळी लावली होती. करपा आणि भाव पडल्याने त्यांनी मध्यंतरी केळी उपटून फेकत ११ एकरात कांदा लागवड केली होती. कांद्याला चांगला भाव मिळून वायद्यानुसार कर्ज फेडता येईल, या आशेवर ते होते. मात्र, उत्पन्न निघायला सुरुवात झाल्यानंतर कांद्याचे भाव पडल्याने मुबारकतडवी कमालीचे हताश झाले. कर्जफेड अशक्य झाल्याने त्यांनी बुधवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास मोहरद (ता.चोपडा) रस्त्यावरील खंडणे शिवारातील शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी अडावद पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक योगेश देशमुख तपास करत आहेत.
सोशलनेटवर्कमुळे उलगडा :मुबारक तडवी यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी जहांगीर तडवी, जावई आरिफ तडवी यांना पहाटे ५.१७ वाजता सुसाइड नोट व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. यामुळे जावयाने तत्काळ किनगाव येथे फोन लावून माहिती दिली. त्यानुसार मुबारकचे वडील, मित्रांनी सकाळीच मुबारकची शोधाशोध सुरू केली. आठच्या सुमारास पळसाच्या झाडाला लटकलेला मुबारकचा मृतदेहच त्यांना गवसला.

कर्जामुळे अात्महत्या
घटनास्थळीमुबारक तडवी यांनी लिहिलेली सुसाइड नोट सापडली. त्यात म्हटले की, अताेनात कर्जामुळे अात्महत्या करीत अाहे. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी धानोरा, कृषी केंद्र, ट्यूबवेलवाले सावकारांचे कर्ज फेडण्यास मी असमर्थ आहे. भारताची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असूनसुद्धा केंद्र राज्य सरकारने भाववाढीसाठी काहीही उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असता तर माझ्यावर ही वेळ आली नसती, असा उल्लेख चिठ्ठीत आहे.
बातम्या आणखी आहेत...