आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापीकीला कंटाळून जळगावातील शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाराेळा- नापिकीला कंटाळून तालुक्यातील टिटवी तांडा येथील शेतकऱ्याने अात्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.१५) दुपारी वाजता घडली. 

टिटवी तांडा येथील मंसाराम बाबुलाल पवार (वय ५५) यांनी रविवारी विषारी द्रव प्राशन केला. नातेवाईकांनी त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डाॅ. योगेश साळुंखे, डाॅ. राहुल जैन यांनी प्रथमोपचार केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पवार यांना धुळे येथील हलवले. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. 
बातम्या आणखी आहेत...