आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Consum Poision In Home, Talked Famlies Members, And Died

शेतात विष घेऊन घरी परतला; कुटुंबीयांशी बोलला, मग मृत्यू!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - सातवीत शिकणारी मुलगी डालीबाई शाळेत निघाली होती, लहानगा चरण अंगणात खेळत होता. पत्नी घरकामात होती. तेवढ्यात शेतात गेलेले केशरीमल नाईक घरी परतले. सर्वांना जवळ बोलावून त्यांना बिलगून ढसाढसा रडत आपल्या बंजारी भाषेत म्हणत होते, "मरेर इच्छा कोनी, पंळ जगळों कठीण छं... म जहर पिलदो छू...' त्यांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच पत्नीने हंबरडा फोडला. शेजारी जमले.
केशरीमल यांना जामनेरच्या रुग्णालयात नेले, पण नियतीने डाव साधला. उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. खडकीचे केशरीमल गुलाब नाईक (४५) यांना दोन एकर शेती आहे. गेल्याच वर्षी त्यांनी विहीर खोदली. दीड एकरात कापूस होता. त्यासाठी सोसायटीचे २६ हजार कर्ज घेतले. खासगी सावकाराचेही कर्ज काढले. पण नापिकी आणि कर्ज परतफेडीच्या विवंचनेत त्यांनी सोमवारी पहाटे अखेर मृत्यूला कवटाळले. ही घटना वाडी-तांड्यावर वा-यासारखी पोहोचली. त्यापाठोपाठ मोरगाव तांडा येथे सुभाष चतरसिंग चव्हाण (४६) या शेतक-यानेही शेतातच विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. कर्ज फेडण्यासाठी सुभाष यांनी दोन एकरांपैकी गतवर्षी एक एकर शेती विकली होती. तरीही कर्ज होतेच. त्यातच घरात चार मुले, वृद्ध आई, पत्नी अशा कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण जात होते.