आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाविष्कारातून रेखाटले शेतक-याचे वास्तववादी जीवन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - सभोवताली घडणा-याघटना व प्रसंग जादुई चित्रातून मांडत समाजास संदेश देण्याचे काम चित्रकार आपल्या कलेतून करतो. आभाळ दाटून आल्यावर शेतकरी पावसाच्या अपेक्षेने आपल्या घराकडे घाईने पोहोचतो, परंतु पाऊस येतच नाही. तर दुसरीकडे मात्र मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस आल्यावर शेतकरी खिल्लारी जोडीसह शेतातून घाईघाईने घराकडे परतत असतो. चित्रांतून शेतकºयांचे सध्याचे वास्तववादी जीवन चित्रकार प्रा.संजय मोरे यांनी रेखाटले आहे. या दोन चित्रांची निवड मुंबई येथे होणा-याराज्यस्तरीय ‘चातक’ चित्र प्रदर्शनासाठी झाली आहे.

चाळीसगावच्या राष्ट्रीय कॉलेजमधील टेक्निकल विभागाचे प्रा.संजय मोरे यांनी चित्रकलेच्या माध्यमातून कलाक्षेत्रात मोहोर उमटवली आहे. त्यांनी स्वत:च्या घरात आर्ट गॅलरी साकारली असून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील अनेक चित्र प्रदर्शनात त्यांच्या जादूई चित्रांची निवड झाली आहे. सभोवताली घडणा-याघटना व प्रसंगाचे वर्णन आपल्या चित्रांतून साकारण्याचा प्रयत्न आजवर प्रा.मोरे यांनी केला आहे. दुष्काळाची झालर संपूर्ण राज्यावर पांघरली गेली आहे. याच धर्तीवर ‘चातक 2014’ नावाचे चित्र प्रदर्शन मुंबई येथील नेहरू आर्ट गॅलरीने आयोजिले आहे. मऊ कुचल्यांच्या साहाय्याने न चितारता प्रा.मोरे यांनी चित्रे तयार केली आहे.

650 पैकी 80 चित्रांची निवड
राज्यभरातील 650 चित्रांची नोंदणी झाली होती. यातील 80 चित्रे अंतिम यादीत समाविष्ट झाली. त्यात प्रा.मोरे यांच्या चित्राची निवड झाली. जून महिन्यात झालेल्या ‘आर्ट फ्यूजन शो’ साठीदेखील मोरे यांच्या चित्राची निवड झाली होती.
दोन चित्रांमधून अनोखा संदेश
प्रा.मोरे यांनी दोन चित्रे रेखाटली आहेत. पहिल्या चित्रात शेतातील वेचलेला काडीकचरा बैलगाडीत टाकून शेतकरी ढग दाटून आल्याने घाईघाईने घराकडे निघाला आहे. त्याला जोरदार पावसाची आस आहे, तोही चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असावा. तर दुस-याचित्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी खिल्लारी जोडीला पळवत शेत रस्त्याने घराकडे जातोय. रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतातील शेतकºयांना हात वर करून आनंदाच्या भरात आवाज देतोय.