आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवळीच्या कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - देवळी (ता.चाळीसगाव) येथील हरी तुकाराम पाटील (वय 35) या शेतकर्‍याने मंगळवारी पहाटे शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. गारपीट व अवकाळी पावसाचा फटका बसल्याने रब्बी हंगाम हातचा गेला होता. त्यातच वीज कंपनीने शेतीपंपाचे कनेक्शन कट केल्याने ते विवंचनेत होते. अवकाळी पावसाने हरी पाटील यांच्या मका व कापसाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र थकित कर्ज कसे फिटणार? या चिंतेने ते अस्वस्थ होते. बँकेचे 50 हजार व विकास सोसायटीचे 60 हजार कर्ज या शेतकर्‍यावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.