आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide News In Marathi, Marathwada, Parola Taluka, Divya Marathi

पारोळा तालुक्यात कीटकनाशक सेवन करून शेतकर्‍याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव/बीड - शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. रविवारी पारोळा तालुक्यातील शेतकर्‍यासह मराठवाड्यातील तीन शेतकर्‍यांनीही आत्महत्या केली.पारोळा तालुक्यातील नगाव येथील शेतकरी सुरेश साहेबराव पाटील (वय 50) यांनी रविवारी सकाळी कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली. त्यांच्यावर एक लाख रुपये सोसायटीचे तर तीन लाख रुपये खासगी बॅँकांचे कर्ज होते. गारपिटीमुळे शेतात लावलेल्या गहू, मकाचे नुकसान पाहून त्यांना धक्का बसला.

नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली. मराठवाड्यातील माजलगाव तालुक्यात राजेवाडी येथे वनारसीबाई बाजीराव मुळे (60) या शेतकरी महिलेने पेटवून घेऊन रविवारी आत्महत्या केली. गोविंद दाढाळे (45, पार्डी, ता. वसमत), राजाराम जहरव (65, बाभूळगाव) व अशोक ब्रिंगणे (22, नागदरा, जि. बीड) येथील शेतकर्‍यांनीही अवकाळी पाऊस व गारपीटमुळे झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या केली.राजेवाडी येथे बाजीराव मुळे व पत्नी वनारसीबाई यांना दोन मुले असून, ते विभक्त राहतात. त्यांना सात एकर कोरडवाहू जमीन आहे. देणी चुकवण्यासाठी त्यातील दोन एकर जमीन वनारसीबाई यांनी विकली. उरलेली पाच एकर जमीन पती-पत्नी कसत होते. सोसायटीचे कर्ज कसे फेडणार, या चिंतेने वनारसीबाई (60) यांनी शनिवारी आत्महत्या केली.