आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केळीसाठी शेतकऱ्यांना वॅगन बुकिंगचे स्वातंत्र्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दाेन वर्षांपासून बंद झालेली रेल्वेद्वारे हाेणारी केळी वाहतूक पुन्हा सुरू केली जाणार अाहे. केळीच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना रेल्वे वॅगन बुकिंगचे स्वातंत्र्य राहणार असून, रेल्वे स्टेशनवरच केळीची माेजणी केली जाणार अाहे, अशी माहिती रावेर लाेकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी साेमवारी दिली.

रेल्वेद्वारे दिल्लीच्या बाजारपेठेत पाठवल्या जाणाऱ्या केळीची वाहतूक दाेन वर्षांपासून बंद हाेती. यापूर्वी रेल्वेने केळी वाहतूक करून ती झांसी येथे माेजली जायची. त्यात वजन जास्त असल्यास शेतकऱ्यांना ११पट दंड भरावा लागायचा; परंतु अाता या व्यवस्थेत बदल झाला असून, जागेवरच माेजणी हाेणार अाहे. तसेच शेतकऱ्यांना हाॅर्टिकल्चर ट्रेनएेवजी व्हीपीयू वॅगन उपलब्ध करून दिली जाणार अाहे. रावेर, सावदा निंभाेरा स्टेशनवरून बंद झालेली केळी वाहतूक पुन्हा हाेणार सुरू असून, स्थानिक रेल्वे स्टेशनवरच केळी वाहतुकीची सुविधा उपलब्धकरून दिली जाणार अाहे. याशिवाय शेतकऱ्याला काेणत्याही बाजारासाठी हव्या तितक्या वॅगनची बुकिंग करता येणार अाहे. सावदा, निंभाेरा अाणि रावेर रेल्वे स्टेशनवर उड्डाणपूल बांधण्याच्या कामास अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात अाली अाहे. त्याचप्रमाणे रेल्वे इंजिनिअर्सच्या पे ग्रेड प्रमाेशनसंदर्भातील मागण्यादेखील सभागृहात मांडल्या अाहेत. अाॅर्डनन्स फॅक्टरीतील अॅप्रेंटीसशिप झालेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्नही मार्गी लागला अाहे. तसेच बाेदवडपर्यंत मंजूर झालेल्या पाचाेरा-जामनेर रेल्वेला अजिंठा लेणीपर्यंत चालवण्याची मागणी करण्यात अाली अाहे.

दत्तक गावासाठी काेटी : दत्तक घेतलेल्या हातेड गावासाठी विविध याेजना कामांच्या माध्यमातून काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला अाहे. बाेदवड सिंचन याेजनेबाबतही पाठपुरावा सुरू असल्याचे खासदार खडसे या वेळी म्हणाल्या.

चाैपदरीकरणासाठी केंद्राकडून निधी : तीन वेळा निविदा काढूनही जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग चाैपदरीकरणाच्या कामाला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे हे काम वेळेत करण्यासाठी स्वत: केंद्र शासन पैसे देणार अाहे. शासनाकडून १०० टक्के निधी मिळणार असल्याने लवकरच निविदा काढून येत्या महिन्यांत काम मार्गी लावण्यात येणार अाहे. तसेच जळगाव शहरातील महामार्गावरील फ्लाय अाेव्हरब्रिजचे कामदेखील याच वेळी केले जाणार अाहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाेबत बैठक झाल्याचे खासदार खडसे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...