आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरच्या दिंडीत जळगावच्या शेतकरी स्मरण रथाचा समावेश; पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते यवतमाळात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर येथील दिंडीत सहभागी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जळगाव येथील डाॅ. सतीश पाटील, संजय पवार, कल्पना पाटील अादी. - Divya Marathi
नागपूर येथील दिंडीत सहभागी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जळगाव येथील डाॅ. सतीश पाटील, संजय पवार, कल्पना पाटील अादी.

जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यवतमाळ येथून काढण्यात अालेल्या दिंडीमध्ये जळगावातील रथाचा समावेश करण्यात अाला अाहे. जळगाव येथून सन १९८३ मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वात कापूस दिंडी काढण्यात अाली हाेती. या दिंडीच्या अाठवणींना उजाळा देणारा चित्ररथ यवतमाळ येथून काढण्यात अालेल्या दिंडीमध्ये सहभागी करण्यात अाला. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी या रथासह दिंडीला रवाना झाले अाहेत. 


यवतमाळ येथून डिसेंबर रोजी दिंडीस प्रारंभ झाला आहे. ही पायी दिंडी ११ डिसेंबर राेजी नागपूर येथे पाेहोचणार अाहे. जळगाव येथून सन १९८३ मध्ये खासदार शरद पवार, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वात नागपूर येथे पायी कापूस दिंडी काढण्यात अाली. या दिंडीतील फाेटाे अाणि मागण्याचे फलक असलेला चित्ररथ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तयार करण्यात अाला अाहे. 


या रथासह जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी डिसेंबर राेजी यवतमाळ येथे रवाना झाले. माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या रथाची पाहणी केली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अामदार डाॅ.सतीश पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, कापूस पणन महासंघाचे संचालक संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष ललित बागुल, जिल्हा समन्वयक विकास पवार, रमेश पाटील, हाजी गफ्फार मलिक, पराग पाटील, अरविंद मानकरी, मीनल पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित हाेते. ११ डिसेंबर राेजी ही दिंडी नागपुरात पाेहोचणार असून तेथे राष्ट्रवादी अाणि काँग्रेस पक्षातर्फे शरद पवार यांच्या उपस्थितीत एकत्रित जाहीर सभेेचे अायाेजन करण्यात अाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...