आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामार्ग जमीन मोजणीस शेतकऱ्यांचा कडवा विरोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग बायपाससाठी शुक्रवारी जमीनमाेजणी करण्यास गेलेल्या प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांनी अडवले. भूसंपादनासाठी जमीनमाेजणी करताना जळगाव शहर अाणि जळगाव बुद्रूक या प्रश्नावर निर्णय देईपर्यंत जमिनीची माेजणी करू देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यावर प्रशासनाने शेतकऱ्यांचे म्हणणे मान्य करत माेजणीएेवजी केवळ खुणांची निश्चिती करण्याची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या हरकतीवर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निर्णय घेतला जाणार असून, त्यानंतरच माेजणी केली जाणार अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी विराेध केल्याने ममुराबाद रस्त्यावर पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला.
जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी ममुराबाद रस्त्यावर निश्चित केलेली शेतजमीन शहराच्या हद्दीमध्ये अाहे. शेतजमिनीच्या ७/१२ उताऱ्यांवरदेखील तसा उल्लेख अाहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गॅझेट प्रसिद्ध करताना त्यात ही जमीन जळगाव बुद्रूकच्या हद्दीमध्ये असल्याचे नमूद केले अाहे. शहर अाणि गावातील हद्दीचे दर वेगवेगळे असल्याने त्यात शेतकऱ्यांचे नुकसान हाेत अाहे. अाधीच शेतकरी जमीन देण्यास तयार नसताना प्रशासनाने जमीन ग्रामीण भागामध्ये दाखवली अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त हाेत असून, या प्रशासकीय चुकीवर शेतकऱ्यांनी हरकत घेतली अाहे.

चूक सुधारल्याशिवाय माेजणी नाहीच
अामच्या शेतांच्या उताऱ्यावर जळगाव शहर हद्द दिलेली असताना राजपत्रात चुकीचा उल्लेख अाला अाहे. अाधी तांदलाज शिवार अाणि अाता जळगाव बुुद्रूक करण्यात अाले अाहे. त्यात दुरुस्ती केल्याशिवाय अाम्ही जमिनीची माेजणी करू देणार नसल्याची भूमिका शेतकरी छबीलदास खडके, अॅड.दीपकराज खडके यांनी घेतली अाहे.
कामास हाेणार विलंब
राष्ट्रीय महामार्गाचे चाैपदरीकरण अाणि शहरातून बायपाससाठी अद्याप पूर्णपणे भूसंपादन करण्यात अालेले नाही. जळगाव शहरालगतच्या जमिनीच्या संपादनाबाबत न्यायालयात अाणि प्राधिकरणाकडे दावे दाखल करण्यात अाले अाहेत. शेतकऱ्यांकडून अद्यापही विराेध केला जात अाहे. दुसरीकडे चाैपदरीकरणाच्या कामासाठी सहा कंपन्यांनी टेंडर दाखल केले अाहेत. ही प्रक्रिया पूर्ण हाेण्यासाठी अाणखी चार ते सहा महिन्यांचा विलंब लागेल. पावसाळ्यातदेखील काम सुरू हाेऊ शकणार नाही. त्यामुळे येत्या वर्षाचा हंगाम संपल्यानंतरच महामार्गाचे काम करणे शक्य अाहे.