आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Suicide News In Marathi, Dhule District, Divya Marathi

धुळे जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - निमगूळ व धामणगाव येथील दोन शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. प्रवीण पाटील व भाऊसाहेब पाटील अशी त्यांची नावे आहेत.महिनाभरात जिल्ह्यातील सहा शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. निमगूळ गावातील भाऊसाहेब उर्फ प्रवीण हेमराज पाटील (33) यांनी बुधवारी शेतात विषारी द्रव प्राशन केले.

सरपंच नवनीत मोरे यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. मृत भाऊसाहेब यांनी सोसायटी तसेच खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. तर धामणगाव येथील प्रवीण पुंडलिक पाटील (28) या तरुण शेतकर्‍याने मध्यरात्री साडेबारा वाजता गावविहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.