आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव डंपरने पाेलिस कर्मचाऱ्याला चिरडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद ते साकेगावदरम्यान बुधवारी दुपारी वाजता भरधाव डंपरने निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले. पोलिस अधीक्षक कार्यालयातून काम अाटाेपून भुसावळ येथील घरी माेटारसायकलने जाताना हा अपघात झाला. याप्रकरणी नशिराबाद पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
भुसावळ येथील मनोज अशोक दारकुंडे (वय २६) हे निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात नेमणुकीला होते. बुधवारी दुपारी पाेलिस अधीक्षक कार्यालयातील काम अाटाेपून ते त्याच्या माेटारसायकलने (क्र. एमएच- १९, सीडी- ७८५६)ने घरी परतत होते. त्या वेळी नशिराबाद ते साकेगावदरम्यान असलेल्या टोल नाक्‍याजवळील भोले ढाब्यासमोर वळण रस्त्यावर त्यांना मागून येत असलेल्या भरधाव डंपरने धडक दिली. यात मनाेज यांचे डंपरखाली चिरडून जागीच मृत्यू झाला.

पाेलिसांनी १० डंपर केले जप्त...
मनोजलाडंपरने उडवले असल्याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक वाघ यांनी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघात झाल्याच्या वेळेत जेवढे डंपर कैद झाले हाेते. त्यांच्यावर कारवाई केली अाहे.

घटनांमुळे मनोजची नशिबाने थट्टाच केली
मनोज दारकुंडे यांचा भाऊ धनराज दारकुंडे यांचाही २०११मध्ये माेटारसायकल अपघातात मृत्यू झाला हाेता. तर तीन वर्षांपूर्वी मनोज यांच्या वडिलांचेही निधन झाले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मनोजचा विवाह झाला होता. सातव्या महिन्यातच त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला; मात्र पूर्ण वाढ झाली नसल्याने त्याचाही मृत्यू झाला. गेल्याच आठवड्यातच मनोजचा घटस्फोट झाला होता.
बातम्या आणखी आहेत...