आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव ट्रकने तरुणाला चिरडले, शिवाजीनगर रस्त्यावर अवजड वाहतुकीचा बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण अनाेळखी असल्याने मृतदेह रस्त्यावरच पडून हाेता.
जळगाव - शिवाजीनगर रस्त्यावर असलेल्या लाल मंदिरासमोर मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ट्रकने २३वर्षीय युवकाला चिरडले. या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मृत युवकाची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

रेल्वे मालधक्क्यावरून खत भरून हा ट्रक (क्र.एमएच-१९-झेड-१८८०) शिवाजीनगरकडून गाेडाऊनकडे जात होता. या वेळी रेल्वेस्थानकाकडून रस्ता ओलांडून अनाेळखी युवक लाल मंदिराच्या दिशेने जात होता. रस्ता ओलांडल्यानंतर त्याने पुन्हा मागे वळून रस्त्याकडे पळण्यास सुरुवात केली. मात्र, याच वेळी ताे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रकचालक मनोज प्रभाकर माेरे (रा.खडके चाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. हा ट्रक बाळू चौधरी यांच्या मालकीचा आहे.

अवजड वाहतुकीचा बळी
गततीन वर्षांपासून शिवाजीनगर पुलावरून अवजड वाहतूक बंद केल्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. त्यासाठी रेल्वे पुलाच्या दोन्ही बाजूंना महापालिकेने सूचना फलकही लावले आहेत. मात्र, हे आदेश केवळ कागदावरच आहेत. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. या मार्गावरून शिवाजीनगर, ममुराबाद रोड, राधाकृष्णनगर, गेंदालाल मिल परिसरातील शेकडो नागरिक विद्यार्थी ये-जा करत असतात. जीव मुठीत घेऊन त्यांना या पुलावरून शहरात यावे लागते. या पुलावरून दर दोन मिनिटाला एक ट्रक वा बस शहरात ये-जा करते. अवजड वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूकही करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडूनही काहीच उपाययाेजना हाेत नसल्याचे या घटनेवरून दिसून येते. तरुणाचा बळी गेल्यानंतर आता तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

बेवारस मृतदेह पाऊण तास पडून
अपघातातमृत झालेला तरुण बेवारस असून, त्याने शर्टही परिधान केलेला नव्हता. अपघात झाल्यानंतर त्याचा मृतदेह पाऊण तास रस्त्यावरच तसेच पडून होते. यादरम्यान पोलिस पोहाेचले नागरिकांनीही गर्दी केली. मात्र, कोणीही रुग्णवाहिका बोलावल्यामुळे त्याचा मृतदेह रस्त्यावरच पडून होता. ब-याच वेळाने रुग्णवाहिका आल्यानंतर त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.