आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याकडून मुलीची लाखांत विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तांबापुरापरिसरातील पित्याने पाेटच्या मुलीला चक्क दाेन लाख रुपयांत विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर अाला अाहे. मेहरूण परिसरातील एका खासगी शाळेत नववीच्या वर्गातशिकणाऱ्या या बालिकेचे १५डिसेंबरला लग्न असल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ला सूत्रांकडून मिळाले अाहे.
टिपू सुलतान चाैकात राहणारी सेजल (नाव बदलले) ही मेहरूण परिसरातील एका खासगी शाळेत नववीतशिक्षण घेत हाेती.तिच्या घराशेजारी राहणाऱ्या फातिमा (नाव बदललेले) नावाच्या महिलेने सेजलच्या वडिलांना पैसे कमावण्याचा साेपा मार्ग सांगितला. यात मुलीचे चांगल्या घरात लग्न हाेईल अािण तुम्हाला पैसेही मिळतील. पैशांच्या लाेभापायी इस्त्री करण्याचे काम करणाऱ्या वामन (नाव बदललेले) अािण त्यांची पत्नी कळसूबाई (नाव बदललेले) यांनी हे मान्य केले. अाॅक्टाेबर महिन्यात मुलीला दाेन लाखांतविक्री केली. तेव्हापासून ती पिंप्री (ता. धरणगाव) येथील विकत घेतलेल्या व्यक्तीच्या घरी राहते. १५दविसांपूर्वी सेजलच्या अाईचा मृत्यू झाला. तेव्हढ्यापुरता वडिलांच्या घरी अाली हाेती. त्यानंतर त्याचदविशीतिला परत नेल्याचे रहविाशांनी सांगितले.