जामनेर - मुलीला शाळेत क्लासला सोडण्यासाठी पायदळ जाणार्या पित्याचा मुलीसमोरच अपघातात मृत्यू झाला. वडिलांचे बोट धरून चालणारी मुलगी मात्र बचावली. परंतु या अपघातामुळे तिच्या बालमनावर आघात झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेसात वाजेदरम्यान घडली. या घटनेनंतर रस्त्यातील काही टपर्या हटवण्यात आल्या. दरम्यान, शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांचे मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे छोट्या-मोठय़ा अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत पोलिस यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच डोकेदुखी बनली आहे.
वीज वितरण कंपनीत मीटर टेस्टर म्हणून असलेले विलास रामदास पाटील (वय 58) यांची मुलगी वैष्णवी जामनेर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकते. ते मुलीला क्लासला सोडण्यासाठी शाळेकडे जात होते.