आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलास जेईई परीक्षेला सोडून घरी निघालेल्या पित्याचा अपघाती मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जेईई परीक्षेसाठी मुलास रायसोनी महाविद्यालयात सोडल्यानंतर घरी परतणाऱ्या पित्याचा शनिवारी शिरसोली रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला. समोरून येणाऱ्या दुचाकीची आणि त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. परंतु दुर्दैव असे की, त्यांच्या मृतदेहाची तब्बल नऊ तासांनंतर ओळख पटली. हा अपघात कसा झाला आणि नेमकी कुणी कुणाला धडक दिली, हेच रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पित्याचे नाव अविनाश मोतीराम पाटील ( वय ५० ) असून पोस्टल कॉलनीत त्यांचे निवासस्थान आहे. ते बाजार समितीत लिपिक पदावर कार्यरत होते.
जेईईसाठी ते मुलगा चिन्मय यास रायसोनी महाविद्यालयात सोडण्यास गेले होते. परत येताना समोरून येणाऱ्या दुचाकीची पाटील यांच्या दुचाकीची समाेरासमाेर धडक झाली. यात पाटील जागीच ठार झाले. तर समोरील दुचाकीवरील दोघे जखमी झाले. अपघातानंतर नागरिकांनी पाटील यांचा मृतदेह सिव्हिलमध्ये आणला. दुपारी १२ वाजता एमआयडीसी ठाण्यात अपघाताची नोंद झाली. मात्र मृत दुसऱ्या दुचाकीवरील जखमींची अनोळखी अशीच नोंद होती. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले दुचाकीचालक बापू राजाराम ताडे (रा.शिरसोली) यांची ओळख पटली.