आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावेर - मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटपासाठी जाणार्या पित्याचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.21) दुपारी 3 वाजता शहरातील नवीन विश्रामगृहासमोर घडली. अपघातात मृताचा भाचाही गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
भागवत भाल (रा.बेलसवाडी) व त्यांचा भाचा मनोज चुडामण इंगळे (वय 35, रा.घोडसगाव, ता.मुक्ताईनगर) हे दोघेजण मोटारसायकलने (क्रमांक एम.एच.19, बी.एन.2358) उटखेडा येथे गेले होते. तेथून परतत असताना रावेरच्या नवीन विश्रामगृहासमोर त्यांच्या दुचाकीला मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसने (क्रमांक एम.पी.09, एफ.ए-3309) जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ महाजन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना साकेगाव येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले. त्याठिकाणी उपचार सुरू असताना भागवत भाल यांचा मृत्यू झाला. याबाबत रावेर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून बसचालक फुलचंद परदेशी (रा.विटनेर) याला पोलिसांनी अटक केली आहे.सहायक पोलिस निरीक्षक सुदाम परदेशी, कॉन्स्टेबल धर्मराज पाटील तपास करत आहेत.
अपघातातील मृत भागवत भाल यांचा मुलगा ईश्वर भाल यांचा विवाह 11 एप्रिलला निश्चित करण्यात आला आहे. मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी निघालेल्या पित्यावरच क ाळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.