Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Father Kidnapped Son And Attempted Suicide

घटस्फोटानंतर पित्यानेच स्वत:च्या मुलाला पोत्यात घालून केले बेपत्ता, नंतर केले हे कृत्य

प्रतिनिधी | Oct 12, 2017, 09:57 AM IST

  • घटस्फोटानंतर पित्यानेच स्वत:च्या मुलाला पोत्यात घालून केले बेपत्ता, नंतर केले हे कृत्य
जळगाव-सहा दिवसांपूर्वीच घटस्फोट झालेल्या एका २९ वर्षीय तरुणाने आपल्या पाच वर्षीय मुलास पोत्यात टाकून कुठेतरी सोडून दिले. त्यानंतर स्वत: घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी जळगावात घडली. जगदीश प्रल्हाद नाईक असे मयत तरुणाचे नाव आहे.

जगदीश हा मेहरूण परिसरातील हनुमाननगर येथे पत्नी रुपाली, मुलगा स्वराज तीन वर्षांची मुलगी रिया यांच्यासोबत राहत होता. पती-पत्नी महादेव मंदिराच्या समोर भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा गाडा ओढत होते. जगदीशला दारूसह इतर व्यसने जडली होती. त्यामुळे कुटुंबात कलह निर्माण हाेऊन पती-पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. ऑक्टोबर रोजीच दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर त्याची पत्नी रुपाली मुलगी रियासह माहेरी (मालदाभाडी ता.जामनेर) निघूनगेली होती. तर जगदीश मुलगा स्वराज हे दोघे हनुमाननगरात राहत होते.

सहा दिवसांपासून उद्विग्न झालेला जगदीश बुधवारी दुपारी २.३० वाजता तांबापूर येथे राहणाऱ्या आई-वडिलांच्या घरी गेला. त्याने आई कल्पनाबाई यांच्याजवळ संताप व्यक्त केला. मुलगा स्वराज याला खदानीत फेकून देऊन मी देखील आत्महत्या करतो, अशी धमकी त्याने आईला दिली होती. त्यानंतर तो संतापातच निघून गेला. ३.३० वाजता कल्पनाबाई हनुमाननगर येथील जगदीशच्या घरी गेल्या असता, त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले. त्यानंतर सर्वांनीच जगदीशचा मुलगा स्वराज याचा शोध घेण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक योगेश शिंदे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुलास पोत्यात टाकून नेल्याची माहिती
जगदीशने मुलास खदानीत टाकून देण्याची धमकी दिली होती. दुपारी वाजेच्या सुमारास तो खांद्यावर एक पोते घेऊन जात असल्याचे परिसरातील लोकांनी पाहिले होते. या पोत्यात त्याचा मुलगा स्वराज असल्याचे परिसरातीलच काही लहान मुलांनी पाहिले हाेते. स्वराज मिळून येत नसल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जगदीशच्या कुटुंबीयांसह नातेवाईक, परिसरातील युवकांनी तांबापुरातील खदान, मेहरूण तलाव परिसर पिंजून काढला. रात्री उशिरापर्यंत स्वराज सापडला नव्हता.

स्वराजचे काय झाले असेल?
जगदीशरुपाली यांचा घटस्फोट होऊन केवळ सहा दिवस झाले होते. अशात बुधवारी जगदीशने आत्महत्या केली. शिवाय त्यांचा मुलगा स्वराज देखील बेपत्ता झाला. त्याच्यासोबत काय प्रकार घडला असेल? हा प्रश्न नागरिकांच्या अंगावर शहारे आणत होता.

Next Article

Recommended