आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याच्या कष्टाची मुलीकडून फेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपिका गंगाधर इटनारे - Divya Marathi
दीपिका गंगाधर इटनारे
जळगाव- शिक्षणासाठी पैसा नसल्यामुळे रिक्षाचालक असलेल्या पित्याने खासगी पतसंस्थेतून कर्ज काढून मुलीला डी.फार्मसीच्या पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण दिले. वडिलांच्या या कष्टाचे सोने करीत त्या मुलीनेही जिल्ह्यातून प्रथम येण्याचे लक्ष अचूकपणे गाठून आपल्या पित्याला मोठी भेट दिली. दीपिका गंगाधर इटनारे (रा.शिवाजीनगर) असे त्या गुणी मुलीचे नाव आहे.

गंगाधर इटनारे हे गेल्या ३० वर्षांपासून रिक्षाचालक आहेत. त्यांना एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी दीपिका दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. तिच्यासमोर अनेक पर्याय होते. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिला माघार घ्यावी लागली. अखेर तीने डी.फार्म करण्याची इच्छा व्यक्त केली. त्या वेळी इटनारे यांनी खासगी पतसंस्थेतून ८० हजार रुपयांचे कर्ज काढले होते.

रिक्षाचालवून घरखर्च, कर्जाची परतफेड, अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्या माथ्यावर पडली होती. असे असताना दुसरीकडे दीपिकानेही सर्व परिस्थिती समजून घेत, वडिलांच्या मेहनतीचे चीज केले. दिवस-रात्र अभ्यास करून तीने डी.फार्मच्या पदविका अभ्यासक्रमात ८८.५० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली अाहे. तिच्या या यशाने वडिलांपुढे अाकाश ठेगणे झाले अाहे
.
या यशानंतर आता तिने पुढील शिक्षणात आणखी जास्त मेहनत घेऊन यशस्वी हाेण्याचा निश्चय केला अाहे. तिच्या या यशात कुटुंबीयांसह महाविद्यालयातील विभागप्रमुख प्रा.बी.एन.बाहेती, प्रा. एस.बी.वाणी, एस.एस.लढे याचा माेलाचा वाटा अाहे.
प्राध्यापिका होण्याचे स्वप्न
डी.फार्मनंतरआता दीपिका बी. फार्म करणार आहे. यासाठी तिला दाेन लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शिक्षण पूर्ण करून याच क्षेत्रात प्राध्यापिका होण्याचे तिचे स्वप्न आहे. यासाठी ती पुन्हा एकदा अभ्यासाला लागली अाहे.