आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगितले पप्पा, निघाला प्रियकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तलाठ्यास ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना पोलिसांचे पथक. - Divya Marathi
तलाठ्यास ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना पोलिसांचे पथक.
(तलाठ्यास ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना पोलिसांचे पथक.)
जळगाव- भुसावळातील खुनाची घटना सणासुदीनिमित्त शहरातील हॉटेल्सची झाडाझडती सुुरू असताना शनिवारी एका तलाठ्याच्या प्रेमप्रकरणाचे बिंग फुटले. म्हसावद-बोरनारच्या तलाठ्याने शहरातील एका हॉटेलमध्ये स्वत:च्या नावावर खोली आरक्षित करून तिथे चक्क प्रेयसीला आणून ठेवले होते. तलाठ्याच्या नावे बुक केलेल्या खोलीत तरुणी आढळल्याने पोलिसांनी तरुणीला ठावठिकाणा विचारला असता, तिने पप्पा म्हणून चक्क प्रियकर तलाठ्याचा फोन नंबर दिला. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच या तलाठ्याचे बिंग फुटले. त्याने स्वत:च ती तरुणी आपली प्रेयसी असल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. याप्रकरणी तलाठी, ती तरुणी अाणि हॉटेलच्या व्यवस्थापकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात गेल्या आठवड्यात झालेल्या मारहाणीच्या दाेन घटना आणि भुसावळात शुक्रवारी झालेल्या खुनाच्या घटनेमुळे सतर्क झालेल्या पोलिसांनी शनिवारी शहरातील जवळपास सर्वच हॉटेल्स, लॉज, कॉटेज गेस्ट हाऊसची कसून तपासणी केली. तपासणीचे काम सुरू असताना रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले यांच्या नेतृत्वाखालील पथक प्रथम हॉटेल कोझी कॉटेजमध्ये गेले. तिथे कसून झाडाझडती घेतली. तेथील रजिस्टर नोंदी तपासल्या. सर्व काही व्यवस्थित असल्याचे पाहून हे पथक पोलिस अधीक्षक बंगल्यासमोरील हॉटेल रॉयल पॅलेसमध्ये दाखल झाले. मात्र, या हॉटेलमधील काही नोंदींमध्ये गडबड असल्याची शंका पोलिसांना आली तलाठ्याचे बिग फुटले.

२६ हाॅटेल्सची तपासणी
शुक्रवारीभुसावळ येथे घडलेली घटना सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर िजल्हा पाेलिस अधीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर यांनी शहरातील सर्व हाॅटेल्स लाॅजची तपासणी करण्याचे अादेश िदले हाेते. त्यानुसार सहायक पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील यांनी माेहीम राबवली. यात २६ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
काहीच घडले नाही
एका प्रतिष्ठित तलाठ्याने बुक केलेल्या खाेलीत त्याच्या पाहुण्याला थांबवले. त्या वेळी फक्त तरुणी एकटीच त्या रूममध्ये हाेती. या प्रकरणी कर्मचाऱ्यांची काही चूक अाढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. प्रदीप अाहुजा, संचालक,राॅयल पॅलेस
ट्रू कॉलरमुळे फुटले बिग
पोलिसांनीताे माेबाइल नंबर ट्रू कॉलर अॅपमध्ये टाकला. या अॅपमध्ये क्रमांकासोबतच तो क्रमंाक वापरणाऱ्याचे नावही मोबाइलवर येते. तरुणीने वडिलांचा म्हणून दिलेला नंबर टाकताच त्यावर लांबोळेचे नाव आले. पोलिसांनी पुन्हा तोच नंबर डायल केला. तसेच ‘आपण सध्या कुठे ड्यूटी करीत आहात?’ असे पोलिसांनी विचारल्यानंतर, आपण सध्या नगरदेवळा येथे असल्याचे लांबोळेने सांगितले. पोलिसांनी त्याला नगरदेवळा कार्यालयाचा लँडलाइन फोन नंबर विचारला त्या वेळी पलीकडून बोलणाऱ्या लांबोळेची बोबडी वळली. त्याने तत्काळ आपण लांबोळेच बोलत असल्याचे कबूल केले. वास्तविक त्या वेळी लांबोळे जळगावातील न्यायालय परिसरात होता. पोलिसांनी तत्काळ लांबोळेेला फोन करून हॉटेलमध्ये बोलावण्यास व्यवस्थापकास सांगितले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास लांबोळे येताच त्याला त्या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

३००० रु. भाड्याची अालिशान खोली
पाठीवरसॅक घेतलेली विशीतील तरुणी पाहताच पोलिसांच्या शंकेला पुष्टी मिळाली. कारण या अालिशान खोलीचे भाडे सुमारे तीन हजार रुपये आहे. लांबोळेने बुक केलेल्या खोलीत २३ वर्षांची तरुणी कशी काय? असे त्यांनी व्यवस्थापकाला विचारले. मात्र, ही खोली लांबाेळेनेच बुक केली असून, या तरुणीबद्दल काहीही माहिती नसल्याचे व्यवस्थापकाने सांगितले.
तरुणीची थापेबाजी
पोलिसांनीत्या तरुणीची विचारपूस सुरू केली. कुठून आली, काय करते, वडील काय करतात अादी प्रश्न विचारताच त्या तरुणीने चाळीसगावची रहिवासी असल्याची माहिती दिली. तसेच वडील रेल्वेत स्टेशनमास्तर असून, जळगावात एका प्रख्यात कोचिंग क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेचा क्लास लावला असल्याचे तिने सांगितले. त्याचबरोबर शहरात सध्या खोली नसल्याने हॉटेलमध्ये राहत असल्याची लोणकढी थापही तिने मारली. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडून वडिलांचा मोबाइल नंबर मागून घेतला. मात्र, या थापेबाज तरुणीने आपल्या वडिलांचा नंबर सांगून चक्क प्रियकर तलाठ्याचा नंबर पोलिसांना दिला.

खोली क्रमांक ३०१
हॉटेलराॅयल पॅलेसमधील ३०१ क्रमांकाची खोली म्हसावद-बोरनारचा तलाठी घनश्याम लांबोळे (वय ३४) याच्या नावे आरक्षित होती. त्याबद्दल पोलिस निरीक्षक वाडिले यांना शंका आली. त्यांनी हॉटेल व्यवस्थापक नीलेश गायकवाडला याबाबत छेडले. वाडिलेंनी नीलेशला विचारताच तो गडबडला. त्यामुळे त्यांनी खोलीची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकातील सुजाता राजपूत, श्यामराव पवार, महेंद्रसिंग पाटील, प्रदीप चौधरी, शरद पाटील नीलेश सूर्यवंशी यांनी तत्काळ खोलीकडे मोर्चा वळवला. खोलीत तिथे एक तरुणी अाढळली.
पाच वर्षांपासून प्रेमसंबंध
पाेलिसांनीकेलेल्या चाैकशीत त्या तरुणीचे लांबाेळेशी गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध अाहेत. त्यालाच भेटण्यासाठी जळगावात आल्याची कबुली तिने दिली. पाेलिसांना तपासणीदरम्यान तिच्याजवळ दाेन माेबाइल हॅण्डसेट मिळाले. त्यापैकी एक लांबाेळेचा असल्याचे तिने सांगितले. त्याच्या माेबाइलमध्ये अश्लील चित्रफीत असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास अाले. तसेच हाॅटेल राॅयल पॅलेसचा व्यवस्थापक नीलेश सुरेश गायकवाड याने पुरुषाच्या नावाने रूम बुक करून महिलेला वास्तव्यास दिली. त्यामुळे ती तरुणी, लांबाेळे अाणि नीलेश या तिघांच्या विराेधात रामानंदनगर पाेलिसात २९२ (२), (२) (अ), ४७७ (अ), १८८ या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
सीसीटीव्हीफुटेज ताब्यात
पाेलिसांनीहाॅटेल राॅयल पॅलेसच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे शनिवारी सकाळपासूनचे फुटेज ताब्यात घेतले अाहे. तसेच हाॅटेलचा व्यवस्थापक नीलेश गायकवाड यालाही चाैकशीसाठी ताब्यात घेतले अाहे.

बिलंदर तलाठी
वाडिलेंनीफोनवर चौकशी सुरू करताच पलीकडून वडील म्हणून लांबोळेच बोलत होता. ती तरुणी म्हणजे माझीच मुलगी अाहे. लांबोळे माझे मित्र आहेत. त्यांनीच माझ्या मुलीसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे, असे या बिलंदर तलाठ्याने सांगितले. त्यानंतर पोलिस माघारी परतले. पण, पोलिसांच्या मनातील शंका दूर झाली नव्हती.
वादग्रस्त तलाठी
म्हसावद-बोरनारचातलाठी असलेला घनश्याम लांबोळे हा वादग्रस्त तलाठी आहे. यापूर्वी शासकीय रकमेचा अपहार केल्याप्रकरणी त्याचे निलंबन झाले होते. मात्र, आघाडी सरकारच्या काळात त्याचे निलंबन मागे घेण्यात आले होते. तो पिंप्राळ्याचा रहिवासी असून, त्याला एक मुलगाही आहे.
तलाठ्यास ताब्यात घेतल्यानंतर हॉटेलमधून बाहेर पडताना पोलिसांचे पथक.