आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन 4 वर्षांच्या मुलासमोर पित्याची आत्महत्या, जळगावमध्‍ये हृदयद्रावक घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेतून परत आल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच आईच्या कुशीत रडताना साबळे यांचा थोरला मुलगा यश. - Divya Marathi
शाळेतून परत आल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी ऐकताच आईच्या कुशीत रडताना साबळे यांचा थोरला मुलगा यश.

जळगाव - चार वर्षांच्या मुलासमोर नारळ पाणी विक्रेत्याने झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सकाळी पांडे डेअरी चौक भागात घडली. डोळ्यांदेखत वडील मृत्यूच्या दाढेत जाताना पाहून भेदरलेल्या मुलाने रडत-रडतच घराशेजारील खासगी रुग्णालयात ड्यूटी करीत असलेल्या आईकडे धाव घेतली. त्याने ‘आई, पप्पा मेला’ असा आर्तपणे आक्रोश करताच तिचाही हंबरडा फुटला.

 

अतिक्रमण हटाव कारवाईच्या धसक्याने आत्महत्या केल्याचा नातेवाइकांचा आरोप

दरम्यान, मनपाच्या अतिक्रमण हटाव कारवाईच्या धसक्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. शशिकांत साबळे (वय ४०)यांनी काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयासमोर नारळपाणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तत्पूर्वी ते रिक्षा चालत हाेते. सततच्या आजारपणामुळे त्यांनी व्यवसाय बदलला होता. पालिकेच्या पथकाकडून हॉकर्सवर कारवाई होत आहे. त्यामुळे साबळे सिव्हीलसमोर हातगाडी लावून पुन्हा घरी येत होते. मात्र, शुक्रवारी त्यांनी घरासमोरच गाडी लावली होती.

 

भजे आणून खाल्ल्यानंतर मृत्यूला कवटाळले
अतिक्रमण हटाव कारवाईमुळे साबळे यांनी शुक्रवारी घरासमोरच नारळ पाणी विक्रीची हातगाडी लावली होती. काही ग्राहकांना नारळ पाण्याची विक्री केल्यानंतर सिव्हिलजवळील टपरीवरून त्यांनी नाश्ता करण्यासाठी भजे आणून खाल्ले. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन मुलाच्या झाेक्याची दाेरी छताच्या अँगलला बांधून गळफास घेतला. ही घटना पाहून त्यांचा चार वर्षांचा मुलगा उदय प्रचंड भेदरला. त्यामुळे रडत-रडत तो आई रत्नमाला काम करीत असलेल्या खासगी रुग्णालयात धावत गेला. या वेळी त्याने ‘आई पप्पा मेला..!’ असे सांगितले. ते एेकून रत्नमाला यांना शाॅक बसला त्यांनी त्या ठिकाणीच आक्रोश सुरू केला. मुलाला साेबत घेत धावत घर गाठले. पतीला बघून त्यांनी मुलाने जाेरात आक्रोश सुरू केला. त्यानंतर सकाळी ११ वाजता शाळेत गेलेल्या मुलगा यश घरी आला. हा प्रकार बघून तो देखील आईच्या गळ्यात पडून रडू लागला. नातेवाइकांनी त्याला रिक्षात बसवले; मात्र त्याने त्यांचे न एेकता आईला कवटाळले.

 

रात्रीच पप्पाने झाेक्याची दाेरी कापली हाेती
‘घरात दोरी नसताना त्यांनी ती कोठून आणली, काहीच भांडण, वाद झालेला नसताना हे काय केले?’ असे म्हणून रत्नमाला रडत होत्या. त्या वेळी रात्रीच पप्पाने झोक्याची दोरी कापली होती, असे यशने सांगितले. हे एेकून रत्नमाला यांच्या पायाखालची वाळू सरकली.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या हृदयद्रावक घटनेशी संबंधीत फोटो....

 

बातम्या आणखी आहेत...