आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीचा परिणाम: गुणवत्ता घसरल्याने कापूस निर्यात थांबण्याची भीती, जिनिंग संकटात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- गुलाबी बाेंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यंदा कापसाची गुणवत्ता ढासळली आहे. तसेच शेतकऱ्यांचे उत्पादनही घटले अाहे. या कापसाला निर्यातक्षम गुणवत्ता मिळत नसल्याने निर्यातदारांनीदेखील जळगावकडे पाठ फिरवून तेलंगणा राज्याकडे आपला माेर्चा वळवला अाहे. त्याचा एकूणच फटका तीन हजार काेटी रुपयांपेक्षाही अधिक उलाढाल असलेल्या कापसावर आधारित कृषी अर्थव्यवस्थेला बसला अाहे. यंदा एेन हंगामात अर्थव्यवस्थेलाचा कीड लागल्याने शेतकरी, मजूर, उद्याेग, निर्यातदारांपुढे अार्थिक संकट उभे राहिले अाहे. 


जळगावसह खान्देशात दरवर्षी १२ ते १५ लाख गाठी कापसाचे उत्पादन होते. यातील जवळपास पाच लाख गाठी कापूस निर्यात होते. त्यासाठी निर्यातदार ऑक्टोबर - नोव्हेंबपासूनच जळगावात ठाण मांडून असतात. डिसेंबरपासून प्रत्यक्ष निर्यातीला सुरुवात होते. मात्र, यंदा अद्याप सौद्यालाचा सुरुवात झालेली नसल्याने कापूस निर्यात थांबण्याची भिती वाढली आहे. 


जळगाव जिल्ह्यात ४.५० लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली अाहे. जिल्ह्यात कापसावर आधारित जीनिंग उद्याेगाचे २०० पेक्षा अधिक कारखाने अाहेत. जिल्ह्यात लांब धाग्याचा कापूस उत्पादित हाेत असल्याने माेठ्या प्रमाणावर व्यापारी, निर्यातदार हे जिल्ह्यातील कापूस हा चीन, बांगलादेश, व्हिएतनामसह अन्य देशांमध्ये निर्यात करतात. यासाठी निर्यातदार नाेव्हेंबरपासूनच जीनिंग उद्याेजकांकडे कापूस गाठीची बुकिंग करतात. या वर्षी मात्र बोंडअळीमुळे जिल्ह्यातील अाणि एकूणच महाराष्ट्रातील कापसाची गुणवत्ता घसरली अाहे. 


बीटी बियाणे सपशेल फेल ठरल्याने पहिल्या वेचणीमध्येच बाेंडअळीने हल्ला केला अाहे. गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणाबाहेर गेल्याने उत्पादनात ५० ते ५५ टक्के घट झाली अाहे. 
गुलाबी बाेंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापसाचे झाड हिरवे दिसत असले तरी त्यावरील कैऱ्यांमध्ये बाेंडअळी शिरल्यामुळे त्याचे बाेंड हाेऊ शकत नाही. येणारा कापूस कवडी असल्याने त्याला अपेक्षित उत्पादन भावही मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी १-२ वेचण्या करून कापूस उपटून टाकला. 


गुणवत्तेवर परिणाम 
गुलाबी बोंडअळीमुळे कापसाची गुणवत्ता खराब झाली अाहे. या वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव अधिक अाहे. त्यामुळे उत्पादन घटले अाहे. निर्यातीलादेखील प्रतिसाद कमी अाहे. गुणवत्ता खराब असल्याने भावामध्येही माेठी तफावत निर्माण झाली अाहे. 
- हर्षल नारखेडे, जीनिंग उद्याेजक, जळगाव 

बातम्या आणखी आहेत...