आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावात पुत्र वियोगानंतर लंगूर मादीला 'टेडीबेअर'चा लळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात सोमवारी पुत्र वियोग असलेले लंगूर मादी दिवसभर भटकत होती. काशिनाथ लॉज परिसरातील रहिवाशांनी तिला खायला दिले. मात्र, तिने अन्नाला शिवलेही नाही. नागरिकांनी टेडिबेअर दिले. त्याला पिलू समजून कवटाळले. त्यानंतर तिने अन्न सेवन केले. थोड्या वेळाने ते टेडीबेअर हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने तिने दुकानाचे नुकसान केले. तिला टेडीबेअरचा चांगलाच लळा लागला होता. ती टेडीबेअरला वारंवार कवटाळत होती. अखेर ते टेडीबेअर घेऊन सायंकाळी ती परिसरातून निघून गेल्याचे पक्षिमित्र वासुदेव गाढे यांनी सांगितले.
(सर्व छायाचित्रे : योगेश चौधरी)

पुढील स्लाईड्‍वर क्लिक करून पाहा, टेडीबेअरला कवटाळणारी लंगूर मादी