आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासाेबत गप्पा मारणाऱ्या तरुणीच्या श्रीमुखात लगावली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बहिणाबाई उद्यानासमाेर मंगळवारी रात्री ९.३० वाजता प्रियकरासाेबत गप्पा मारत असलेल्या तरुणीला घराशेजारी राहणाऱ्या तरुणाने मारहाण केली. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी थेट तरुणाची धुलाई करत त्याला जिल्हापेठ पाेलिसांच्या ताब्यात दिले. त्या ठिकाणी तरुणीच्या अाईला बाेलवण्यात अाल्यानंतर तिने मीच त्या मुलाला माझ्या मुलीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी तरुणावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला साेडून दिले.

यवतमाळ येथील करिना (नाव बदललेले) ही तरुणी शहरातील एका चारचाकीच्या शाेरूममध्ये काम करते. दाेन वर्षांपासून ती शिवाजीनगरात राहत अाहे. सुरुवातीला ती एकटीच राहत हाेती. त्या वेळी तिच्या अाईने घराशेजारी राहणाऱ्या केदार (नाव बदललेले) या तरुणाला तिच्याकडे लक्ष ठेवण्याचे सांगितले हाेते. करिनाच्या वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांपासून अाई तिच्याकडे राहते. गेल्या काही दिवसांपासून करिनाला रात्री घरी येण्यास उशीर हाेत हाेता. तिला उशीर का हाेताे, हे बघण्यासाठी तिच्या अाईने केदार याला पाठवले. करिना शाेधत शाेधत केदार मंगळवारी ९.३० वाजता रात्री बहिणाबाई उद्यानाजवळ अाला. त्या वेळी ती एका तरुणासाेबत गप्पा मारत उभी हाेती. त्याचा राग अाल्याने केदारने करिनाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून तिच्यासाेबत असलेला तिच्या प्रियकराने धूम ठाेकली. तर केदारने तिला मारहाण करत राजस हाॅस्पिटलपर्यंत घेऊन गेला. हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या चार नागरिकांनी केदारला पकडून धुलाई केली. काही वेळानंतर घटनास्थळी जिल्हापेठ पाेलिस ठाण्याचे कर्मचारी अाले. त्यांनी केदारला अाणि करिनाला पाेलिस ठाण्यात अाणले. त्यानंतर करिनाच्या अाईला बाेलवले. त्यांनी मीच केदारला करिनावर लक्ष ठेवण्याचे पाेलिसांना सांगितले. त्यामुळे पाेलिसांनी केदारवर प्रतिबंधात्मक कारवाई करून साेडून दिले.

फक्त लक्ष ठेवण्यासाठी सांगितले हाेते
अाईनेकेदारला फक्त लक्ष ठेवण्याचे सांगितले हाेते. पण त्याने थेट मला मारहाण केल्याचे करिनाने पाेलिसांना सांगितले. मात्र, तिने याप्रकरणी तक्रार दिली नाही. त्यामुळे काेणताही गुन्हा दाखल करण्यात अाला नाही.
बातम्या आणखी आहेत...