आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी, महिला बालकल्याण समितीसाठी फिल्डिंग, महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या आर्थिक नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या स्थायी समितीतील निवृत्त अाठ सदस्यांच्या नियुक्तीसाेबत महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या निमित्ताने नगरसेवकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली अाहे. अातापर्यंत कोणतेही पद मिळालेल्या सदस्यांनी यासाठी भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. सदस्यांच्या नियुक्तीबाबत महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची सोमवारी बैठक बोलावली हाेती. परंतु, त्याकडे अनेकांनी पाठ फिरवली.

महापालिकेच्या स्थायी समितीचे अाठ सदस्य तसेच महिला बालकल्याण समितीचे सर्व सदस्य अाॅक्टाेबर राेेजी निवृत्त हाेत अाहेत. त्यामुळे नवीन सदस्य निवडीच्या हालचालींना वेग येत अाहेे. स्थायी समितीत काेणाला संधी मिळते, याबाबत नगरसेवकांमध्ये नावांची चाचपणी सुरू झाली अाहे. अातापर्यंत कोणतेच पद मिळालेल्या सदस्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त हाेत अाहे. परंतु, अत्यंत महत्त्वाच्या स्थायी समितीत अभ्यासू विषयाची जाण असलेल्या सदस्यांना घेण्यात यावे, असाही सूर अाहे. महापाैर नितीन लढ्ढा यांनी साेमवारी दुपारी गटनेत्यांची बैठक घेतली. याला उपमहापौर तथा मनसेचे गटनेते ललित काेल्हे, विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते सुनील माळी उपस्थित हाेतेे. मनपाच्या ७४ सदस्यांमधून जागा भरणार अाहेत. यासाठी ९.७८ गुणोत्तर काढले अाहे.
बातम्या आणखी आहेत...