आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fielding For The Jalgaon Corporation's Chief Medical Officer

जळगाव पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारीपदासाठी फिल्डिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि प्रमुख वैद्यकीय अधिकारीपदासाठी सोमवारी पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदासाठी चार उमेदवार असले तरी पालिकेतील काही पदाधिकार्‍यांकडून डॉ. राम रावलानी यांच्या हातात रुग्णालयांचा कारभार देण्यासाठीच्या दृष्टीने हालचाली सुरू आहे.


पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी या पदाच्या चार जागांसाठी तसेच प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदासाठी सोमवारी सकाळी 11 वाजेपासून पालिकेत पात्र उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती आहे. दोन महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनातर्फे पदे भरण्यासाठी काढलेल्या जाहिरातीमध्ये एकूण 11 अटी देण्यात आल्या होत्या. एखाद्या अर्जदाराने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवड समितीवर दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल, अशी दुसर्‍या क्रमांकाची अट टाकली आहे. प्रमुख वैद्यकीय पदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे पालिका प्रशासनाने जाहीर केलेले नसताना पालिकेच्या सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या नावासाठी पालिकेतील काही पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत.

मुलाखतींना मी नसेल
पालिका आयुक्तपदाचा पदभार सांभाळत असल्याने निवड समितीचा अध्यक्ष मी आहे. मात्र, दुसरी कामे असल्याने सोमवारी होणार्‍या मुलाखत प्रक्रियेला मी उपस्थित राहणार नाही. ज्ञानेश्वर राजूरकर, प्रभारी आयुक्त