आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिबट्याच्या हल्ल्यात पाचवा बळी; वरखेडे शिवारात महिला ठार; पाच महिन्यात 14 गुरांचाही फडशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- शेतात कापूस वेचणीस गेलेल्या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ही महिला जागीच ठार झाली. ही घटना रविवारी वरखेडे गावाच्या शेजारील पळसमणी शिवारात घडली. गेल्या पाच महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यातील हा पाचवा बळी अाहे. तसेच १४ गुरेही ठार झाली अाहेत. 


चाळीसगाव तालुक्यात वरखेडे येथील गिरणा नदी पात्रालगत पळसमणी शिवारात रविवारी १२ महिला कापूस वेचणी करीत हाेत्या. यापैकी सुसाबाई धना भील (वय ५५) ही महिला दुपारी ३.३० वाजता झऱ्यावर पाणी घेण्यासाठी गेली. तेव्हा बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. जबड्यात पकडून त्याने फरपटत नेऊन डाेके मानेचे लचके ताेडले. त्यात ही महिला जागीच ठार झाली. 


पाच महिन्यात पाच बळी 
८ जुलै: राहुल चव्हाण (वय ८) 
११ सप्टेंबर : अलका अहिरे (५०) 
११ नाेव्हेंबर : बाळू साेनवणे (१२) 
१५ नाेव्हें. : दीपाली जगताप (२५) 
२७ नाेव्हेंबर : सुसाबाई भील (५५)  

बातम्या आणखी आहेत...