आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेड काढल्यावरून राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये शिवीगाळ, गुलाबरावांबद्दल अपशब्द उच्चारले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन मुलींची छेड काढणाऱ्या युवकाच्या विरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यात जोरदार वाद झाला. तर, वादादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द उच्चारले गेले. सोमवारी दुपारी वाजता रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या बाहेर हा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत हा वाद मिटवला. 

 

प्रभात चौकातून जात असलेल्या तीन मुलींची दुचाकीवरून आलेल्या युवकाने छेड काढल्याची घटना रविवारी दुपारी ते २.१५ वाजेदरम्यान घडली. या मुलींनी छेड काढणाऱ्या युवकाच्या दुचाकीचा क्रमांक लक्षात ठेवला होता. त्यानंतर संबंधित मुली रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. त्यामुळे या मुलींनी सोमवारी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी शोभा चौधरी यांना संपर्क साधून मदत मागितली. दुपारी वाजता शोभा चौधरींसह मुली रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. मुलींनी दिलेल्या क्रमांकावरून पोलिसांनी दुचाकी (क्रमांक एमएच- १९, बीडब्ल्यू- ३९००) जप्त करून आणली. ही दुचाकी राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते तथा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश माणिक पाटील यांचा मुलगा राकेश पाटील याची असल्याचे समोर आले. त्यामुळे राकेश यानेच छेड काढली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी मुलींसह शाेभा चौधरी यांनी लावून धरली. याच वेळी रमेश पाटील हे पोलिस ठाण्यात दाखल झाले. पाटील आल्यामुळे वाद सुरू होण्यास सुरुवात झाली. पोलिस निरीक्षक बी. जे. रोहम यांनी संबंधित मुली, चौधरी यांच्यासह पाटील यांच्याशी चर्चा केली. नेमका काय प्रकार घडला, याची माहिती त्यांनी करून घेतली. पाटील यांनी आपला मुलगा राकेश निर्दाेष असल्याचे सांगितले. तर मुलींनी फेसबुकवरून राकेशचा फोटो पाहून त्यानेच छेड काढल्याचे पोलिसांना सांगितले. दुचाकी राकेशची होती, परंतु छेड कुणी काढली? याचा पत्ता लागत नव्हता. परिसरातील एका पाणीपुरी विक्रेत्याने छेड काढली असल्याचे पाटील यांचे म्हणने होते. त्यानुसार पाणीपुरी विक्रेत्याला देखील पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. परंतु, त्याने छेड काढली नसल्याचे खुद्द त्या मुलींनीच सांगितले. अखेर मुलींच्या फिर्यादीवरून दुचाकीचालकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

बाहेर पडताना झाली शिवीगाळ 
पोलिसनिरीक्षक रोहम यांनी दोन्ही पक्षांचे म्हणने ऐकून घेतल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यानंतर पाटील चौधरी यांना बाहेर जाण्यास सांगितले. पोलिस ठाण्यातून बाहेर पडत असताना दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. काही मिनिटातच हा वाद विकोपाला गेला. मंत्री गुलाबाराव पाटील यांच्याबद्दल देखील अपशब्द वापरले गेले. घाणेरडे राजकारण करून मंत्री पाटील आपल्या मुलाचे आयुष्य उद््ध्वस्त करत आहेत, असा आरोप रमेश पाटील यांनी केला. तर शोभा चौधरी यांनी देखील रमेश पाटील यांच्यावर संताप व्यक्त केला. रोहम यांनी हा वाद मिटवण्यासाठी स्वत: पुढाकार घेत दोघांना तेथून निघून जाण्याच्या सूचना केल्या. या वेळी शिवसेनेचे महानगराप्रमुख शरद तायडे, गणेश सोनवणे, भूषण सोनवणे आदी उपस्थित झाले होते. 

 

खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न 
माझ्यामुलास रविवारी मुलीकडची मंडळी पाहण्यासाठी आली होती. त्यामुळे दुपारी ते सायंकाळी वाजेपर्यंत आमचे सर्व कुटुंब घरी होते. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. माझ्या मुलास खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा शिवसेनेचे पदाधिकारी तसेच मंत्री गुलाबराव पाटील प्रयत्न करत असल्याचा आरोप रमेश पाटील यांनी या वेळी केला. 

 

सीसीटीव्ही तपासणार 
राकेशयाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. राकेश घरी असल्याचे रमेश पाटील यांनी सांगितले आहे. तर मुलींच्या मते राकेशने छेड काढली आहे. या सर्व शक्यतांची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची भूमिका घेतली आहे. फुटेज मिळाल्यानंतर छेड काढणारा समोर येईल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...