आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक-मुलतानी गट पुन्हा आमने-सामने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - राजकमल थिएटरमध्ये झालेल्या वादानंतर रविवारी पुन्हा मलिक व मुलतानी गटातील वाद उफाळून आला. नेहरू चौकात आमलेट खाण्यासाठी आलेल्या दोघांना मुलतानी गटाने मारहाण केल्याने शहर पोलिस ठाण्यासमोर जमाव जमला होता. तणाव वाढल्याने राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण करण्यात आले होते. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. यावेळी संतप्त जमावाने वाहनांचे नुकसान केले.
महिनाभरापूर्वी क्षुल्लक कारणावरून राजकमल थिएटरमध्ये वाद झाला होता. त्यानंतर रविवारी पुन्हा मलिक व मुलतानी गटातील जुना वाद उफाळून आला. काट्याफाईलमधील मलिक कुटुंबीयांकडे लग्न सोहळा होता. त्यासाठी आलेल्या दोन-तीन जण नेहरू चौकाजवळ खाद्यपदार्थांच्या गाड्यावर खाण्यासाठी गेले होते. तेथे रात्री 8 वाजता गेंदालाल मिल परिसरातील मुलतानी गटाच्या तरुणांसोबत शाब्दिक वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात मलिक गटाचे तारीक अजिज इकबाल व फहाद अब्दुल रहीम मलिक (दोघे रा.काट्याफाईल) हे जखमी झाले. हा प्रकार समजताच काट्याफाईलमधील तरुण शहर पोलिस ठाण्यात जमले होते.
मुलतानी समजून बदडले
नेहरू चौकात हा वाद सुरू असताना शाहूनगरातील वादासंदर्भात चर्चा करण्यासाठी मेहरूण परिसरातील निजामखान मासूमखान मुलतानी हे शहर पोलिस ठाण्यात पोहचले. त्यावेळी मलिक गटाचा जमावदेखील त्याठिकाणी होता. आलेला व्यक्ती हा मुलतानी आहे व या वादाशी संबंधित असल्याच्या गैरसमजातून जमावाने निजामखान यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
संतप्त जमावाकडून वाहनांचे नुकसान
जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर आलेल्या जमावाने पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रय} केला. यावेळी पोलिसांनाही लोटालोटी करण्याचा प्रय} केल्याने अखेर जमाव पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. संतप्त जमावाने फुले मार्केट परिसरातील वाहनांचे नुकसान केले. तणाव वाढत असल्याने पोलिस निरीक्षक कुबेर चौरे यांनी कंट्रोलरूमशी संपर्क साधून राखीव दलाच्या दोन तुकड्यांना पाचारण केले. यावेळी डीवायएसपी वाय.डी.पाटील यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रय} केले. रात्री उशिरापर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी पथके पाठवण्यात आली होती.