आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाच्या आवारात पक्षकारांमध्ये हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जिल्हासत्र न्यायालयात खावटी प्रकरणाच्या सुनावणीला आलेल्या पतीने पत्नीच्या नातेवाइकाला न्यायाधीश ए.डी.बोस यांच्या न्यायालयाच्या बाजूला असलेल्या वऱ्हांड्यातच मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.
जिल्हा न्यायालयात शहरातील एका प्रकरणात खावटीसाठी दोन्ही पक्षाची मंडळी आली होती. सुनावणीच्या अगोदर न्यायाधीश बोस यांच्या न्यायालयाच्या बाजूला असलेल्या वऱ्हांड्यात पती उभा होता. त्याला पत्नीच्या नातेवाइकाने तीन मुले आहेत; पुन्हा एकदा विचार कर, पुन्हा एकदा बायकोला नांदायला घेऊन जा असे सांगितल्याचा राग आल्याने त्याने पत्नीच्या नातेवाइकाच्या कानशिलात लगावली. त्यामुळे दोन्ही पक्षात धक्काबुक्की होऊन गोंधळ उडाला. या संदर्भात न्यायाधीश बोस यांनी पोलिसांना बोलावून कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, त्या वेळी पोलिस चौकीत एकही पोलिस उपस्थित नसल्यामुळे न्यायाधीशांनी पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या सदस्यांना वेगवेगळे करीत वाद मिटवला. मात्र, तासभर न्यायालयात हा गोंधळ सुरू होता.