आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाणामार्‍यांनी गाजला बुधवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरात विविध कारणांवरून गोलाणी मार्केट, रेल्वे स्थानक परिसर आणि इंडिया गॅरेज परिसर या ठिकाणी वेगवेगळ्या कारणातून हाणामारी झाल्या. गुरुवारी दुपारी 2 वाजता नोकरीचे आमिष देऊन पैसे उकळल्याप्रकरणी झालेल्या वादातून इंडिया गॅरेज येथे नागरिकांनी तीन जणांना चोप दिला. सायंकाळी 5 वाजता गोलाणी मार्केटमध्ये शौचालयाच्या वादातून म्हसावदच्या एकाला मारहाण झाली. तर सायंकाळी 6 वाजता रेल्वे स्थानक परिसरात लक्झरीच्या आसनावर बसण्याच्या वादातून एकास बेदम मारहाण झाली.
लक्झरीत बसण्यावरून मारहाण
मुंबई येथील देशमुख नावाची एक व्यक्ती व जळगावातील जयंत पाटील यांच्यात रेल्वे स्थानक परिसरात हाणामारी झाली. दोघांनीही मयुर ट्रॅव्हल्समधुन मुंबईला जाण्याचे सीट बुक केले होते. दोघांनाही एकाच क्रमांकाचे सीट देण्यात आले. देशमुख हे आधी सिटवर बसले होते. त्यानंतर पाटील पोहचले. दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. क्षणातच त्याचे हाणामारीत रुपांतर झाले. देशमुख यांना मारहाण झाली. स्थानकाजवळच्या पोलिस चौकीत प्रकरण पोहचल्यानंतरही काही जणांनी त्यांना चौकीत घुसून मारण्याचा प्रयत्न केला. अखेर हे प्रकरण शहर पोलिस ठाण्यात पोहचले. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी शहर पोलिस ठाणे गाठुन प्रकरण समजुन घेतले. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल नव्हती.
पैसे उकळल्याच्या रागामुळे दिला चोप
नाशिक येथील पद्माकर हिराभाऊ इंगोले यांच्या मुलाला नोकरीला लाऊन देण्यासाठी भडगाव येथील लक्ष्मीकांत अहिरे याने 75 हजार रूपये घेतले होते. मात्र तो खोटे बोलत असल्यामुळे इंगोले कुटुंबीयांनी पैसे परत मागितले. दुपारी 2 वाजता अहिरे हा इंगोले कुटुंबीयांना इंडिया गॅरेज परिसरात भेटायला आला. चर्चेला वादाचे स्वरुप प्राप्त झाले. इंगोले कुटुंबियांनी अहिरे याला मारहाण सुरू केली. अहिरेने पळ काढला. त्याला रोखण्यासाठी इंगोले यांनी ‘पकडा हा सोन्याची चेन तोडून पळतो आहे’, अशी आरडा-ओरड केली. ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अहिरेला पकडून बेदम मारहाण केली. याच दरम्यान इंगोले यांनी पुन्हा अहिरेला ताब्यात घेत आमचा वेगळा विषय आहे, असे सांगताच संतप्त जमावाने इंगोले यांच्यासह त्यांच्या मुलालाही बेदम मारले. यात त्यांच्या मुलाचा उजवा हात फॅ्रक्चर झाला. तर अहिरे याच्या चेहर्‍यावर दुखापत झाली होती. त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल झाला नव्हता.
शौचालयाच्या वापरावरून तरुणास बदडले
म्हसावद येथील आसिफ नावाच्या व्यक्तीने गोलाणी मार्केट येथील शौचालयाचा वापर करण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी सुनील अशोककुमार मकडीया यांनी त्याला मज्जाव केला. याचा राग आल्यामुळे आसिफने शिवीगाळ केली. याचा राग येऊन गोलाणी मार्केटमधील काही व्यापार्‍यांनी आसिफला बदडले. त्याला शहर पोलिस ठाण्यात नेले होते. मकडीया यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आसिफच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.