आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल करा, उल्हास पाटलांनी मांडला ठराव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या अाराेपांची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांमार्फत करता ती उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत करण्यात यावी. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असा ठराव काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. उल्हास पाटील यांनी सोमवारी पक्षाच्या बैठकीत मांडला.

जळगावात झालेल्या कांॅग्रेसच्या बैठकीत बाेलताना माजी खासदार प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील म्हणाले, सत्तारूढ पक्षातील मंत्र्यांचे कारनामे जनतेसमोर आले आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ राजीनाम्यावर सुटणार नाही; तर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करावा उच्च न्यायालयातील न्यायाधीशांकडून चौकशी करण्याच्या मागणीचा ठराव त्यांनी मांडला. या ठरावास सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी यांनी अनुमोदन दिले.