आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या परखड दांपत्यावर गुन्हा, पाणीपुरवठा याेजनेत गैरव्यवहारप्रकरणी काेर्टाचा अादेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या गैरव्यवहाराबाबत भाजपचे परखड पती, पत्नीसह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला अाहे. त्यात उपअभियंता, शाखा अभियंता यांचाही समावेश अाहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे मालदाभाडी गावासाठी सन २००२मध्ये ४९ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. सन २००२पासून ते २०१५पर्यंत बनावट खोटी बिले टाकून पाणीपुरवठा योजनेसाठी मंजूर असलेली रक्कम संबंधितांनी काढून घेतली. यासंदर्भात संजय प्रकाशचंद जैन यांनी दिलेल्या तक्रारींवरून चौकशी करण्यात आली. चाैकशीत १५ लाख, १७ हजार, ६१९ रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशीअंती उघडकीस आले होते. गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट होऊनही संबंधितांविरुद्ध कारवाई झाली नसल्यानेमालदाभाडी ग्रामस्थ जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. मात्र, त्याचाही उपयोग झाल्याने अखेर संजय जैन यांनी जामनेर न्यायालयात फिर्याद दिली. न्यायालयाने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जामनेर पोलिस ठाण्यास दिले. त्यानुसार सोमवारी २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेआहेत आरोपी : माजीजिल्हा परिषद सदस्या विद्यमान सरपंच उषा परखड, त्यांचे पती तथा पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब परखड, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन उपअभियंता ए.एन.पाटील, शाखा अभियंता ए.बी.तायडे, ग्रामविकास अधिकारी मांगो साळुंके, ग्रामसेवक एस.पी.बोडके, पाणीपुरवठा समिती पदाधिकारी सुरेश परखड, उखर्डू बोरसे, दीपक मावरे, बाबुराव कचाटे, नारायण किरोते, तुळशीराम गवाळे, अनिल पढार, बळीराम खराटे, नारायण जंगले, राजेंद्र कापसे, गजानन नानोटे, बाजीराव घ्यार, पंढरी पाटील, देविदास पाटील, गणेश उंबरकर, नंदाबाई कापसे, वसंता सपकाळे, युवराज पालवे, समाधान नानोटे.