आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांमध्ये रमताे, मात्र नाटकच माझा अाॅक्सिजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सिनेमाअाणि टीव्ही मालिकांमध्ये मी रमताे. मात्र, नाटकाशिवाय राहूच शकत नाही. नाटक हा माझा अाॅक्सिजन अाहे. अनेक जण मला भेटतात, त्यामुळे त्यांच्यातून मला काम करण्याची ऊर्मी मिळते. ती नवीन काम करायला प्रेरणादायी ठरते., असे मत सिने अभिनेता नाट्यकलावंत संदीप पाठक याने ‘दिव्य मराठी’शी बाेलताना व्यक्त केले. व. वा. वाचनालयाच्या वर्धापनदिनानिमित्त अायाेजित "वऱ्हाड निघालयं लंडनला' या नाटकाचा प्रयाेग सादर करण्यासाठी संदीप शहरात अाला असता त्याने ‘दिव्य मराठी’शी संवाद साधला तो त्याच्या शब्दात...
‘टाइमपास-२’साठी अाग्री शिकलाे
मलाएकच प्रकारची भूमिका करायला अावडत नाही. भूमिकांमधून काहीतरी सकस काम करायचे अन्यथा करत नाही. विनाेदी, ग्रामीण बाेलीभाषेतील, गांभीर्य असलेली भूमिका केलेली अाहे. नकारात्मक भूमिका करायला अावडेल. ‘टाइमपास-२’ वेगळा विषय हाेता. त्यासाठी खास अाग्री भाषेचा अभ्यास केला. त्यामुळे समाजातील नागरिकांनाही मी त्यांचाच असल्याचे वाटले.

नाटकाचाप्राेफेसर व्हायची इच्छा
घरातअाई-वडील दाेघेही माजलगाव (जि. बीड) येथे प्राध्यापक हाेते. त्यामुळे मलाही शिक्षकच व्हायचे हाेते. अभ्यासात चांगला असल्याने सायन्स घेतले. मात्र, डाॅक्टर हाेऊनही अॅक्टरच झालाे असताे. त्यामुळे अभिनयच करायचा, असे ठरवले नव्हते. परंतु, नाटकाचा प्राेफेसर व्हायची इच्छा हाेती.

‘वऱ्हाड...’ प्रत्येक वयाेगटासाठी
वऱ्हाड...मधीलविमान प्रवास ग्रामीण भागासह परदेशातील नागरिक अावडीने अनुभवताे. परदेशातील नागरिकांना लग्न साेहळा अनुभवायला िमळत नसल्याने ते भावनिक हाेतात; तर ग्रामीण भागातील नागरिक ते अावडीने पाहतात. लक्ष्मणरावांनी हे नाटक ज्या उंचीवर पाेहाेचवले, ते टिकवून ठेवण्यासाठी माझा नेहमी प्रयत्न असताे. अबुधाबी येथे प्रयाेगादरम्यान लहान मुलांकरिता खेळण्यासाठी स्वतंत्र जागा ठेवली हाेती. मात्र, एकही मुलगा तेथे खेळायला गेला नाही, हे नाटक संपल्यावर कळले. म्हणजे लहान मुलांनीदेखील या नाटकाचा अानंद घेतला. सध्याच्या काळात माेबाइल, इंटरनेट असतानाही प्रेक्षकाला रंगभूमीशी खिळवून ठेवण्याचे यशस्वी काम नाटकं करीत अाहेत.

नाटक प्रबाेधनाचे काम करते
नाटकहे फक्त विनाेदी म्हणून नाही, तर प्रबाेधनाचे कामही करीत असते. नाटकाची सुरुवात झाली, तेव्हापासूनच स्थानिक समस्यांवर नाटकाने भर दिला आहे. अाजकाल तरुण पिढी पथनाट्याद्वारे तर लहान मुले बालनाट्याद्वारे प्रबाेधन करीत अाहेत. नाटक हे प्रत्यक्ष पाहिले जाणारे असल्याने त्याचा प्रभाव हा लवकर प्रेक्षकांवर पडताे.
भारतासहपरदेशात २१० प्रयाेग
लक्ष्मणरावदेशपांडे यांचे गाजलेले ‘वऱ्हाड निघालयं लंडनला’ या नाटकाचे शिवधनुष्य त्याने उचलले अाहे. काही वर्षांपासून वऱ्हाड...चा एकपात्री प्रयाेग संदीप साकारत असून अातापर्यंत त्याने भारतासह परदेशात २१० प्रयाेग सादर केले अाहेत. येणाऱ्या काही दिवसांत ‘डबल सिटी' स्वामी समर्थांच्या जीवनावर अाधारित "देऊळ बंद’ या सिनेमांमध्ये ताे दिसणार अाहे.
मुलाखत