आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Finally BJP's 12 Corporators Give Their Works List

...अखेर भाजपच्या १२ नगरसेवकांनी दिली कामांची यादी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २५ कोटींच्या निधीतून होणाऱ्या कामांवरून सद्या भाजपांतर्गत कलह सुरू असून भाजप खाविआ यांच्यातही वाकयुद्ध सुरू झाले आहे. कालपर्यंत कोणतीही भूमिका देणाऱ्या भाजपच्या १२ नगरसेवकांनी अखेर मंगळवारी कामांची यादी विरोधी पक्षनेत्यांकडे सादर केली. बुधवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ खडसेंकडे याद्या सादर केल्या जाणार आहेत.

शहरासाठी जाहीर झालेल्या २५ कोटींतून होणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या ८४ कामांवरून सध्या वादळ उठले आहे. महासभेत आयत्यावेळचा विषय घेऊन १२ मीटरच्या आतील रस्त्यांचाही समावेश केल्याने भाजपच्या नगरसेवकांनीही यासाठी आग्रह धरला आहे. परंतु भाजपमध्येच यावरून दोन गट पडले होते. परंतु मंगळवारी विरोधी पक्षनेते वामनराव खडके, गटनेते डॉ. अश्विन सोनवणे आमदार सुरेश भोळेंच्या पत्नी सीमा भोळे हे वगळता अन्य सर्वांनीच आपल्या प्रभागातील कामांची यादी दिली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत राजकारण पेटण्याची शक्यता आहे.

खाविआवर थेट आरोप
खाविआचेस्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी भाजप नगरसेवकांच्या प्रभागात १० कोटींची कामे असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात नगरसेवक सुनील माळी नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांनी बरडेंचे आरोप फेटाळले आहेत. दोघांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात १२ मीटर रस्त्यांचे काम ठरले असताना मग नंतर १२ मीटरपेक्षा लहान रस्ते कसे घुसवले, असा प्रश्न केला आहे. या कामांसंदर्भात नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याचेही म्हणणे आहे. आमचा यादीला विरोध नसून त्यात आमच्याही प्रभागातील रस्ते घ्यावेत, अशी मागणी आहे. कामांसाठी आग्रह करणे गैर आहे का? असा सवालही केला आहे. पालकमंत्री खडसेंकडे तक्रार केल्याने खाविआचे पितळ उघडे पडल्याचा उल्लेख करत ज्या रस्त्यांना एक रुपयाही खर्च करण्याची गरज नाही, त्या रस्त्यांचेही काम केले जाईल. या मागे स्वत:चे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नगरसेवक माळी यांनी केला.