भुसावळ - इटारसीजवळ रेल्वेच्या सेंट्रल केबिनला लागलेल्या अागीमुळे १७ जून ते २१ जुलै या ३५ दिवसांच्या कालावधीत हजारो रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या. मात्र, मंगळवारी (दि.२१) दुपारी ३.३० वाजता रिले प्लॅनरचे काम पूर्ण झाल्याने, दुपारपासूनच या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात अाली.
१७ जूनला सिग्नलच्या रिले प्लॅनरला लागलेल्या अागीमुळे सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला हजारो प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या हाेत्या. २२ जुलैपर्यंत सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण केले जाणार हाेते. मात्र, युद्धपातळीवर सुरू असलेल्या कामामुळे दिलेल्या मुदतीपूर्वीच, अर्थात २१ जुलै राेजीच काम पूर्ण झाले. मंगळवारी दुपारपासून या मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरळीत झाली. मुंबईकडून इटारसीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या नियमित वेळेवर धावतील. यामुळे एक हजार पेक्षाही अधिक रेल्वेगाड्या रद्द झाल्या हाेत्या.