आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंसह राजकीय नेते, रेल्वेस्टेशन-धार्मिक स्थळे उडवून देण्याच्या ISISची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेले धमकीचे पत्र - Divya Marathi
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेले धमकीचे पत्र
जळगाव - राज्यात मानवी बॉम्ब स्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार  असल्याची धमकी कुख्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसने एका पत्राद्वारे दिली आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यालयाच्या टपाल खात्याला हे धमकीचे पत्र मिळाले आहे. यावर आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे.  
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या राजकीय नेत्यांसह रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळे उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे. 
जळगाव जिल्हाधिकारी कार्यायाने या पत्राची माहिती तातडीने राज्याच्या गृहविभागाला कळवली आहे. या वृत्ताला पोलीस अधीक्षक दत्तात्रय कारळे यांनी दुजोरा दिला असून पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...