आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खान्देश विकास आघाडीचे प्रमुख नेते रमेश जैन यांच्याविरुद्ध तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- खान्देश विकास आघाडीचे प्रमुख नेते रमेश जैन हे निवडून येण्यासाठी मतदारांना आमिष देत आहेत, अशा आशयाची लेखी तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार मुकुंद ठाकूर यांनी गुरुवारी पोलिस मुख्यालयात केली आहे. दरम्यान, याच तक्रारीत माजी उपमहापौर भारती सोनवणे यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे हे मतदारांशी दमदाटी करत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

गुरुवारी रमेश जैन आणि कैलास सोनवणे यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दिली आहे. रमेश जैन हे प्रभाग 21 ‘ब’, तर भारती सोनवणे 21 ‘अ’मधून खाविआच्या तिकिटावर उमेदवारी करत आहेत. तसेच ठाकूर हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.

महापौरांसह ‘खाविआ’च्या दोघांविरुद्ध तक्रार
महापौर किशोर पाटील व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. प्रभाग 36 ‘अ’मधील भाजपचे उमेदवार अँड.सत्यजित पाटील यांनी महापौर पाटील यांच्याविरुद्ध मतदारांना प्रलोभन दिल्याची तक्रार केली आहे. दुसर्‍या तक्रारीत प्रभाग 34मधील उमेदवार साधना रोटे, मीनाक्षी पाटील व धुडकू सपकाळे यांनी प्रा.चंद्रकांत सोनवणेंविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यात प्रा.सोनवणे ज्या शिक्षक कर्मचार्‍यांचा प्रचारासाठी वापर करत आहेत, त्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केल्याचे म्हटले आहे.