आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात लाकडी इमारतीला फटाक्यांमुळे तिसऱ्यांदा अाग, सुदैवाने जीवितहानी टळली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमाेरील जुन्या लाकडी इमारतीला साेमवारी दुपारी वाजता अचानक अाग लागली. यात चार घरे जळून खाक झाली. सुदैवाने अाग दिवसा लागल्याने काही घरे रिकामी असल्याने प्राणहानी झाली नाही.
 
नवजीवन मंगल कार्यालयात असलेल्या लग्नात लावलेल्या फटाक्यांमुळे अाग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे अाहे. तर शार्टसर्किटमुळे अाग लागल्याचे काहींचे म्हणणे अाहे. दरम्यान, याच इमारतीला यापूर्वीही दाेन वेळा मंगल कार्यालयात फाेडलेल्या फटाक्यांमुळे अाग लागल्याची माहिती घरमालक राेहिनी चाैधरी यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना दिली.
 
जयकिसनवाडीतील नवजीवन मंगल कार्यालयासमाेरील लाकडी इमारतीत सहा घरे अाहेत. विनायक रामदास दीक्षित यांच्या मालकीचे मंगल कार्यालय या इमारतीच्या शेजारीच अाहे. यातील तळमजल्यावर रमेश भीमजी सेठ यांनी अरुण प्रल्हाद कस्तुरे यांना भाड्याने दिलेले अाहे. कस्तुरे यांचा गॅरेजचा व्यवसाय अाहे. गॅरेजच्या वस्तू ठेवण्यासाठी ते या घराचा गाेडाऊन म्हणून उपयाेग करतात. यात अाॅइल, अाॅइल फिल्टर तसेच इतर साहित्य पडलेले असते. घराचा मागचा भाग काेसळल्याने दीक्षित पिंप्राळा परिसरात राहण्यासाठी गेले अाहेत. तर त्यांच्या बाजूचे दाेन मजले बन्सीलाल रसवंतीचे मालक अानंद बन्सीलाल राणा यांच्या मालकीचे अाहेत. ते सुद्धा याठिकाणी राहत नाहीत. त्यांनी अडगळीचे साहित्य या घरात ठेवलेले अाहेत.

तर काेपऱ्याच्या वरच्या मजल्यावर उन्मेष यशवंत चाैधरी तर खालच्या मजल्यावर दीपक प्रकाश चाैधरी हे त्यांची अाई राेहिनी प्रकाश चाैधारी यांच्या साेबत राहतात. साेमवारी दुपारी वाजता अरुण कस्तुरे यांच्या गाेडाऊनला अाग लागली. गाेडाऊनमध्ये अाॅइल अाणि अाॅइल फिल्टर असल्याने अागीने राैद्ररूप धारण केले. त्यातच इमारत लाकडी असल्याने अाग अधिकच वाढली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अाठ बंबांनी दाेन तास अाग विझवण्याचा प्रयत्न केला. अाॅइलमुळे पाणी टाकल्यामुळे अाग अधिकच पसरत हाेती. शेवटी जैन इरिगेशनचा बंब मागवण्यात अाला. एक तास प्रयत्न केल्यानंतर अाग अाटाेक्यात अाली. अागीमुळे, जयकिसनवाडीसह, नवीपेठ, विसनजीनगर, रेल्वेस्थानक परिसरात धूर पसरला हाेता.
बातम्या आणखी आहेत...